आजकाल सर्वच किचन मॉड्यूलर झाले आहेत. जून्या वस्तूंची जागा आता नवीन आधुनिक वस्तूंनी घेतलेली पाहायला मिळत आहे. सध्या बहुतांश किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी सर्वोत्तम क्वालिटीचे गॅस स्टोव वापरले जातात. जर तुमच्या कुटुंबात 5 ते 6 लोक असतील, तर तुम्हाला दोन बर्नर असणाऱ्या गॅस स्टोवऐवजी 3 बर्नर असणारे गॅस स्टोव कधीही उत्तम ठरू शकतात. यामुळे पटकन स्वयंपाक करता येतो.
3 बर्नर गॅस स्टोव अतिशय महाग असतात. मात्र आता तुम्हाला बजेटची काळजी करण्याची गरज नाही. अॅमेझॉनवर Prestige, Milton आणि Sunflame या कंपन्यांच्या गॅस स्टोववर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. तसेच अनेक ऑफर्स देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत. चला तर, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Milton Premium 3 Burner Gas Stove
'Milton' कंपनीचा 3 बर्नर असणाऱ्या या गॅस स्टोवची मूळ किंमत 6149 रुपये आहे. मात्र अॅमेझॉनवर या गॅस स्टोववर 55 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. हा डिस्काउंट पकडून या गॅस स्टोवची किंमत केवळ 2,789 रुपये होते. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले, तर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Bank credit card) EMI स्वरूपात खरेदी केल्यावर 1000 रुपयांचा त्वरित डिस्काउंट दिला जाणार आहे.
हा गॅस स्टोव EMI स्वरूपात खरेदी केल्यावर त्याचा मासिक हप्ता 133 रुपयांपासून सुरू होतो. EMI हे प्रत्येक बँकेनुसार बदलू शकतात. अॅमेझॉनवरून हे उत्पादन खरेदी केल्यावर ग्राहकांना 10 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी देण्यात येते. तसेच कॅश ऑन डिलिव्हरी आणि फ्री डिलिव्हरी चार्जेसची सुविधा देण्यात येत आहे.
Prestige IRIS LPG Gas Stove
'Prestige' कंपनीच्या गॅस स्टोवची किंमत 7950 रुपये आहे. अॅमेझॉनमध्ये या गॅस स्टोववर 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट पकडल्यानंतर या गॅस स्टोवची किंमत 3,939 रुपये होते. एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डवरून या गॅस स्टोवची खरेदी केल्यानंतर 500 रुपयांचा त्वरित डिस्काउंट दिला जात आहे.
हा गॅस स्टोव EMI स्वरूपात खरेदी केल्यावर याचा मासिक हप्ता 188 रुपयांपासून सुरू होतो. अॅमेझॉनवरून हे उत्पादन खरेदी केल्यावर ग्राहकांना 10 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी, कॅश ऑन डिलिव्हरी आणि फ्री डिलिव्हरी चार्जेसची सुविधा देण्यात येत आहे.
Sunflame Stainless Steel 3D Gas Stove
'Sunflame' कंपनीचा हा गॅस स्टोव अॅमेझॉनवरून ग्राहक 50 टक्के डिस्काउंटसोबत खरेदी करू शकतात. या गॅस स्टोवची मूळ किंमत 7,300 रुपये आहे. मात्र 50 टक्के डिस्काउंटमुळे हा केवळ 3,659 रुपयांना खरेदी करता येतो. ग्राहकांना हा स्टोव EMI स्वरूपात खरेदी करता येऊ शकतो. मासिक 175 रुपयांपासून हा हप्ता चालू होतो. बँक ऑफर्सबाबत बोलायचे तर, एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डवरून या गॅस स्टोवची खरेदी केल्यावर ग्राहकांना त्वरित 1500 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी कमीत कमी 5000 रुपयांची शॉपिंग ग्राहकांना करावी लागणार आहे. अॅमेझॉनवरून हे उत्पादन खरेदी केल्यावर ग्राहकांना 10 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी देण्यात येत आहे. तसेच कॅश ऑन डिलिव्हरी, फ्री डिलिव्हरी चार्जेसची सुविधा देण्यात येत आहे.