Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मुंबईतील Best Co-Working Spaces जाणून घ्या

Best Co-Working Spaces in Mumbai

Best Co-Working Spaces: मुंबईसारखं शहर हे स्टार्टअप किंवा नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना नेहमीच खुणावत असतं. पण हे शहर तितकंच महाग ही आहे. पण अशाच लोकांसाठी मुंबईत को-वर्किंग स्पेसेस सुरू करण्यात आली आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही अनेकांना वेगवेगळ्या बाबतीत भुरळ घालणारी महानगरी आहे. कोणी इथे पोटापाण्यासाठी येतो. तर कोणी फिरण्यासाठी येतो. कोणाला इथलं फास्ट लाईफ आवडतं. तर कोणाला मुंबई ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी वाटते. त्यामुळे प्रत्येकला मुंबईत आपलं घर किंवा ऑफिस असावं असं वाटतं. पण इथल्या जमिनींच्या, घरांच्या, ऑफिसच्या किमती ऐकल्या की, पायाखालची जमिन सरकल्याचा भास होतो.

मुंबईसारखं शहर हे स्टार्टअप किंवा नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना नेहमीच खुणावत असतं. कारण इथे बिझनेस आहे. ग्राहक आहे; मार्केटिंग स्ट्रॅटेजी पूर्ण करणाऱ्या संस्था, तज्ज्ञ आहेत. पण सर्वांनाच ही मुंबई परवडते असे नाही. ज्यांना मुंबईत राहूनच काम करायचे आहे किंवा इथे राहून व्यवसाय करायचा आहे. अशा लोकांसाठी मुंबईच्या कल्चरने भन्नाट अशी Co-Working Spaces सुरू केली आहेत. या को-वर्किंग स्पेसेसमधून तुम्ही तुमचा कामधंदा आणि ऑफिससुद्धा चालवू शकता. तर आज आपण मुंबईतील बेस्ट अशी Co-Working Spacesची माहिती घेणार आहोत.

WeWork BKC

को-वर्किंग स्पेसेस कल्चरमध्ये WeWork ही ग्लोबल लिडर मानली जाते. वुई वर्कचे बान्द्र-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (Bandra-Kurla Complex-BKC) को-वर्किंग स्पेस आहे. वुई वर्कने सुरू केलेल्या को-वर्किंग स्पेसच्या भन्नाट अशा इन्फ्रास्ट्रक्चरने लोकांना भुरळ घातली आहे. या को-वर्किंग स्पेसमुळे बीकीसीमध्ये येणाऱ्या अनेक लोकांना एक चांगला पर्याय मिळाला आहे. इथे येणाऱ्या लोकांना जवळपास 10 प्रकारच्या अॅमेनिटीज मिळतात. यामध्ये पार्किंगसह, आऊटडोअर स्पेस, बाईक स्टोरेज, वेलनेस रूम, मिटिंग रुम, टेक्निकल सपोर्ट आणि इव्हेंट करण्यासाठी देखील भरपूर जागा उपलब्ध आहे.

Mumbai Co-Working

मुंबईतील अंधेरी वेस्ट भागात मुंबई को-वर्किंग आहे. हे प्रोफेशनल आणि केंद्रीत काम करणाऱ्यांसाठी परफेक्ट ठिकाण असल्याचे सांगितले जाते. इथल्या फ्लेक्सिबल प्लॅनमुळे फ्री-लान्सर आणि लहान-लहान टीम असलेल्या स्टार्टअपसाठी खूप फायद्याचे ठरत आहे. इथे सुपर हाऊसकिपिंग, कॉफी-टी, फास्ट इंटरनेट, एसी, प्लेझोन आणि प्रोफेशनल आयटी सपोर्ट मिळतो.

Best Co-Working Spaces

Awfis Space

Awfis Space हे लोखंडवालामध्ये स्थित असून, इथे वेगवेगळ्या प्रकारचे, किमतीचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये हॉट डेस्कपासून ते प्रायव्हेट ऑफिसेससाठीचे पर्याय आहेत. इथल्या डिझायनिंग लूकमुळे कामातील एकाग्रता वाढते आणि डोक्याला चालना मिळण्यास मदत मिळते. असा जाहिरात या को-वर्किंग स्पेसबाबत केली जाते. Awfisचे ऑफिस अंधेरी वेस्टमधील अॅस्टॉन बिल्डिंगमध्ये दहाव्या मजल्यावर आहे. इथे सीटनुसार केबिन्स आणि डेस्क उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कॉन्फरन्स, पार्किंग-कुरिअर सर्व्हिस, मिटिंग-प्रेझेन्टेशन रूम, टी-कॉफी, वायफाय, फूड आदी सेवा दिल्या जातात.

The Playce

मंबईतील सेंट्रल रेल्वेलाईनवरील मुलुंड वेस्ट येथे The Playce या नावाने डायनामिक असे को-वर्किंग स्पेस आहे. जिथे तुमच्या क्रिएटीव्हिटीला आणि प्रोडक्टीव्हिटीला चालना मिळू शकते. इथे डेस्क, केबिन, स्टुडिओ आणि व्हर्च्युअल ऑफिसचे प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये डे पास, इको डेस्क, स्टॅण्डर्ड डेस्क, ऐसपैसे असे लक्झुरिअस डेस्क उपलब्ध आहेत. याची बेसिक किंमत 2,800 रुपयांपासून 9,500 रुपयांपर्यंतचे वर्क स्पेस उपलब्ध आहेत.

Regus Mumbai 

Regus Mumbaiची मुंबईतील वेगवेगळ्या भागात अनेक ठिकाणी को-वर्किंग स्पेसेस आहेत. यांनी आपल्या को-वर्किंग स्पेसेसचा दर्जाच जागतिक पातळीनुसार ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रोफेशनल आणि बिझनेस कॅटेगरीतील लोकांकडून Regus Mumbaiला बऱ्यापैकी मागणी असते. यांची अंधेरी वेस्ट, लोअर परेल, सायन, पवई, ठाणे, नवी मुंबई अशा ठिकाणी स्पेसेस आहेत.