Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Fraud: गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधताना सावध राहा, अन्यथा होऊ शकते फसवणूक!

Online Fraud

Online Fraud: कोणतीही माहिती हवी असेल तर ती आपण गुगलवर शोधतो. कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधताना तेथे भामटे आपला नंबर देतात आणि मग आपण त्यांच्याशी संपर्क साधतो. यात संधीचा फायदा घेत ते मोबाईल हॅक करून आपली माहिती चोरतात आणि मग फसवणुकही करतात.

Online Fraud: ऑनलाईन केलेली शॉपिंग वेळेत आली नाही, ऑर्डर केलेले जेवण अर्धवटच आले किंवा घरातील वीज गेली, स्मार्टवॉच चार्ज होणेच बंद झाले तर आपण लगेचच गुगलवर जाऊन त्या - त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधतो आणि तिथे कॉल लावून तक्रार करतो. मात्र अशाप्रकारे नागरिक कस्टमर केअर नंबर शोधतात, हे लक्षात आल्याने काही सायबर भामटे तिथे खऱ्या कस्मटमर केअर नंबरऐवजी त्यांचा नंबर देतात आणि आपण कस्टमर केअरला नाही तर भामट्यांना संपर्क साधतो, मग ते कॉलच्या, मेसेजच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये मालवेअरद्वारे शिरकाव करतात आणि मग फोन हॅक करून आपली माहिती चोरतात, आपल्या बँक अकाऊंट किंवा युपीआयपर्यंत पोहोचतात आणि पैसे गायब करतात.

कस्टमर केअर नंबर शोधताना  खोट्या नंबरवर संपर्क होऊन पुढे मोबाईल हॅक करण्याची प्रकरणे बऱ्याच काळापासून होत आहेत. तरी अशी फसवणूक होऊ नये म्हणून कोणतीच सिस्टीम अपडेट झालेली नाही, अशी फसवणुकीची प्रकरणे अजुनही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यात भर म्हणजे, मोबाईल हॅक करून त्यातील डेटा, फोटो वापरून ब्लॅकमेल केले जाते, कधी ते फोटो, व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. काहीवेळा धमकी वैगरे काह न देता, अश्लिल वेबसाईटवर काँटेंट पोस्ट केला जातो, याबाबतच्या अनेक तक्रारी येत असतात. साधाधर पोलीस ठाण्यात दर महिन्याला अशा 1 ते 2 तक्रारी येतात, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वीची घटना आहे. एका गृहस्थाने मिंत्रा ई-क़मर्स कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली. कॉल केला त्यावर मिंत्राचीच व्यक्ती बोलत आहे असे भासवण्यात तक्रार दिल्यावर काहीच घडले नाही, त्यांनीही 300 रुपयांचा विषय असल्याने मुद्दा सोडून दिला. पुढे, बरोबर 15 दिवसांनी त्यांच्या मोबाईलवरुन विविध लोकांना फोन गेले, गरज आहे पैसे हवेत असे मेसेज गेले, त्यांना हा प्रकार काही समजला नाही. नंतर दोन दिवसांनी अकाऊंटमधून 50 रुपये गेले शॉपिंगवर असे दिसले. त्यानंतर व्हॉट्सअॅप गृहस्थाचे मॉर्फ केलेले फोटोज आणि सोबत धमकीचा मेसेज हे फोटो व्हायरल करेन लगेचच 50 हजार पाठव असे सांगण्यात आले, एवढी मोठी रक्कम नाही असे सांगितल्यावर त्यांच्याकडून 20 हजार रुपये घेण्यात आले. मग त्यांनी त्यांच्या  मित्राला ही सर्व घटना सांगितली, त्यांनी लगचेच पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला, त्याननुसा ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कस्टमर केअर नंबरच्या शोधात या सर्व गोष्टी अंगावर ओढवून घेतल्या आहेत, हे तक्रारीनंतर एका महिन्याने समजले, जेव्हा त्या भामट्यांना सायबर पोलिसांच्या तुकडीने शोधून काढले, हा सत्य प्रसंग त्या गृहस्थांनी महामनीला सांगितला आहे, मात्र त्यांनी नाव उघड कऱण्यास नकार दिला.

कस्टमर केअरनंबर कसा शोधावा? (How to Find Customer Care Number?)

गुगलवर थेट कस्टमर केअर नंबर कधीच शोधू नये. तर, गुगलवर त्या कंपनीची अधिकृत वेबसाईट शोधावी. वेबसाईट सापडल्यावर त्यात शेवटी कॉपी राईट, गोपनीयतेचे नियम, वापरण्याचे नियम आदी आहे का हे तपासा, तसेच त्यांच्या अबाऊटमध्ये जाऊन त्यांची माहिती पाहा. मग त्याच्या संपर्क किंवा सपोर्ट किंवा कस्टमर आदी सेक्शनमध्ये जाऊन कस्टमर केअर नंबर पाहावा. मग त्या नंबरवर कॉल करावा.

आपण ज्या ठिकाणाहून शॉपिंग केली त्याच अॅपवर किंवा वेबसाईटवर कस्टमर सपोर्टचे सेक्शन असते, तेथून काँटॅक्ट करणे आणि समस्या सांगणे जास्त सोप्पे आहे. तसेच सरकारशी सलग्न समस्या असल्यास सरकारी वेबसाईट ज्यावर gov.in असे लिंक अॅड्रेसमध्ये असते. त्यात वेबसाईटला अधिकृत मानून त्यावरील नंबरवर संपर्क साधावा, ही माहिती आयटी इंजिनियर अमित नायर यांनी दिली.

फोन हॅक होऊ नये म्हणून (To prevent the phone from being hacked)

आपला फोन कधीच हॅक होऊ नये म्हणून मोबाईलमध्ये मालवेअर प्रोटेक्टर घालावे, जेणेकरून मोबाईल कायम सुरक्षित राहिल. हे एक प्रकारचे अँटी व्हायरसच असते. मात्र अँड्रॉईड आणि आयओएस मोबाईलसाठी उपयुक्त ठरते. यामुळे मोबाईलवर कोणी अटॅक करण्याचा प्रयत्न केला, तरी ते मालवेअर मोबाईलमध्ये सोडू शकणार नाही, त्यामुळे पुढे होणार हानी टळू शकते, असे नायर यांनी सांगितले.