भांडवली बाजार नियामक सेबीने कॅपव्हिजन (Capvision) गुंतवणूक सल्लागार कंपनीची नोंदणी रद्द केला आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना शेअर मार्केटमधून हमखास परतावा देण्याचा दावा करत होती. कंपनी ग्राहक आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करून बाजारात पैसे गुंतवण्याचा सल्ला देत होती. 2014 मध्ये ही कंपनी भांडवली बाजार नियामक सेबीकडे गुंतवणूक सल्लागार म्हणून नोंदणीकृत झाली होती. ही एक पार्टनर फर्म होती. प्रकाश मिश्रा आणि रेखा मिश्रा हे या कंपनीचे संचालक आहेत.
चुकीचा गुंतवणूक सल्ला
SEBI ने केलेल्या चौकशीत आढळून आले की कॅपव्हिजन गुंतवणूक सल्लागार कंपनी ग्राहकांकडून अयोग्य आणि गैरमार्गाने पैसे स्वीकारत आहे. याशिवाय कंपनी आपल्या ग्राहकांना एक पत्रक देत होती . ज्यामध्ये कंपनीने खात्रीपूर्वक परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ग्राहकांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे कंपनी दावा फोल ठरला. SEBI ने आपल्या आदेशात म्हटले आहे की, कंपनीच्या वतीने असे दावे करणे चुकीचे आहे कारण असे दावे गुंतवणूकदारांना खोटी आश्वासने देतात. PFUTP (फसवणूक आणि अनफेर ट्रेड प्रॅक्टिसेस) नियमन अंतर्गत अशा प्रकारची सेवा फसवणुकीच्या प्रकारात मोडते.
याआधी दोन वेळेस कारवाई
याआधीही कंपनीविरोधात 2 न्यायालयीन आदेश जारी करण्यात आले होते. त्याअंतर्गत कंपनीला 75 लाख आणि 8 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. गुंतवणूक सल्लागाराच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीविरुद्ध हे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र, कंपनीने हा दंड अजून भरलेला नाही.
अशा प्रकारे कंपनीने केली फसवणूक
पी.चौरसिया या नावाने बँक उघडण्यात आले होते. यात क्लायंटकडून बँकेत जमा झालेली रक्कम कॅपव्हिजन इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर लिमिटेड (CIAL) नावाच्या दुसर्या कंपनीकडे यायची. या कंपनीचे मूळ संचालक रविप्रकाश मिश्रा आणि रेखा मिश्रा होते. सेबीच्या मुख्य महाव्यवस्थापक गीता.जी म्हणाल्या की, हे संपूर्ण प्रकरण फसवणुकीशी संबधित आहे. त्या पुढे म्हणाल्या की रवी प्रकाश मिश्रा आणि रेखा मिश्रा यांनी त्यांच्या ग्राहकांच्या हितासाठी म्हणून काहीही केले नाही आणि अशा प्रकारे PFUTP (प्रोहीबीटीशन ऑफ फ्रॉडयूलेंट अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टीसेस) नियमांचे उल्लंघन झाले आहे.
www.zeebiz.com