Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Telegram Fraud: टेलिग्रामवर आर्थिक व्यवहार करत असाल तर खबरदार! मुंबईतल्या युवकाने गमावले 1 लाख रुपये!

Telegram Fraud

झटपट पैसे कमावण्याच्या नादात सायबर चोरांच्या आमिषाला बळी पडून काही नागरिकांचे बँक खाते रिकामे होत आहे. अलीकडेच मुंबईत अशी एक घटना घडली आहे. 27 वर्षीय तरुणाला तब्बल 1 लाख रुपयाला गंडवण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

गेली काही दिवस सायबर चोरांनी देशभरात धुमाकूळ घातलेला दिसतोय. काही आठवड्यांपूर्वी व्हॉट्सअॅपवर परदेशातून कॉल येत होते आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची प्रकरणे वाढली होती. सरकारने याबाबत व्हॉट्सअॅपला विचारणा केल्यानंतर यावर गंभीर दखल घेतली गेली होती. आता व्हॉट्सअॅप नानात्र टेलिग्राम खात्याद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या काही घटना समोर येत आहे.

झटपट पैसे कमावण्याच्या नादात सायबर चोरांच्या आमिषाला बळी पडून काही नागरिकांचे बँक खाते रिकामे झाले आहे. अलीकडेच मुंबईत अशी एक घटना घडली आहे. 27 वर्षीय तरुणाला तब्बल 1 लाख रुपयाला गंडवण्यात आले असल्याचे समोर आले आहे. सदर प्रकरणात सायबर चोराला झटपट पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडून या युवकानेच पैसे दिल्याचा अजब प्रकार घडला आहे.

टेलिग्रामद्वारे झाली फसवणूक 

गुंतवणूक करून कमी वेळात पैसे दुप्पट-तिप्पट करण्याचा हव्यास या तरुणाच्या अंगावर आलाय. सायबर चोरांनी टेलिग्राम खात्यावर सदर युवकाशी संपर्क केला. एकाच दिवसात गुंतवलेल्या पैशांवर जबरदस्त परतावा देऊ असे या युवकाला सांगितले गेले. सायबर चोरांनी पहिल्यांदा या युवकाला केवळ 1000 रुपये गुंतवणूक करून ट्रायल घेण्यास सांगितले. यासाठी टेलिग्रामवर एक पेमेंट लिंक पाठवली गेली. सदर युवकाने विश्वास ठेवत त्यांना हजार रुपये पाठवले. थोड्या वेळाने टेलिग्राम खात्यावर ही रक्कम 1620 रुपये दिसू लागली.

गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो आहे असा विश्वास बसल्यावर सायबर चोरांनी या युवकाकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. या युवकाने देखील मागचा पुढचां विचार न करता सायबर चोरांना एक लाख रुपये पाठवले. थोड्या वेळाने खात्यात 2.2 लाख रुपये दिसू लागले.

गुंतवणुकीवर मिळालेला परतावा काढण्याचा प्रयत्न जेव्हा या युवकाने करू पाहिला तेव्हा मात्र बँक खात्यात पैसेच नसल्याचे युवकाच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक खाली आहे असे लक्षात आल्यांनंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक कशी टाळायची

टेलिग्रामवर खरे तर कसलेही आर्थिक व्यवहार करू नयेत. टेलिग्रामवर PayRequest करून PayPal ने पैसे पाठवण्याची किंवा घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. इथे थेट बँक खात्यातून आर्थिक व्यवहार करता येतात. मात्र असे करणे धोकादायक ठरू शकते. कोणत्याही व्यक्तीची कसून चौकशी केल्याशिवाय पैशांचे व्यवहार करणे टाळायला हवे.मुख्य म्हणजे झटपट पैसे कमावण्याच्या फंदात पडू नका, तुम्हाला गुंतवणूक करायचीच असेल तर व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या.