हॉलिवुडमधील प्रसिद्ध सिने निर्माता कंपनी 'वॉर्नर ब्रदर्स'साठी यंदाचे वर्ष जबरदस्त ठरले आहे. त्यांचा बार्बी सिनेमाने (Barbie Movie Collection) जगभरातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. 21 जुलै 2023 रोजा वर्ल्डवाइड रिलिज झालेल्या बार्बीने आतापर्यंत 1 बिलियन डॉलर्सची (भारतीय चलनात 8200 कोटी) कमाई केली आहे.
वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सने रविवारी 'बार्बी' सिनेमाच्या जगभरातील कमाईची आकडेवारी जाहीर केली. 'बार्बी'ने तिकिट विक्रीतून 1 बिलियन डॉर्लस कमाईचा टप्पा ओलांडला आहे. हॉलिवुडमध्ये अशा प्रकारची ऐतिहासिक कामगिरी करणारा 'बार्बी' हा अलिकडच्या काळातला पहिलाच ब्लॉकबस्टर सिनेमा आहे.
समाजात महिलांना समान वागणूक मिळावी. महिलांचे हक्क अधिकार, सन्मान, स्वावलंबन यावर हा सिनेमा भाष्य करतो. महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या पटकथेवर बार्बी सिनेमा तयार करण्यात आला आहे.
कॉमेडीवर आधारित मार्गोट रॉबी हीची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने अमेरिका आणि कॅनडामधून 459 मिलियन डॉलर्सची कमाई केली. जगभरातील इतर देशांमधून 'बार्बी'ला 572.1 मिलियन डॉलर्सचे उत्पन्न मिळाले आहे. थिएटर रिलिजमधून 'बार्बी'ने वॉर्नर ब्रदर्सला 1.0315 बिलियन डॉलर्सचे उत्पन्न मिळवून दिले.
'बार्बी' या यशाने अनेक रेकॉर्ड देखील केले आहेत. बिलियन डॉलर्सची कमाई करणाऱ्या 'बार्बी'च्या पटकथा लेखिका ऑस्कर पुरस्कार विजेत्या ग्रेटा गेर्विग या पहिल्या सिने निर्मात्या ठरल्या आहेत.
कॉमस्कोअर या संस्थेच्या आकडेवारीनुसार मागील आठवडअखेरिस 'बार्बी'ने जगभरातून 127 मिलियन डॉलर्सची कमाई केली.
वॉर्नर ब्रदर्ससाठी 'बार्बी'ची कमाई चालू वर्षातील दुसरी कमाई ठरली आहे. याआधी एप्रिल महिन्यात रिलिज झालेल्या दि सुपर मारिओ ब्रदर्स या सिनेमाने 1.357 बिलियन डॉलर्सची कमाई केली होती. तिकिट विक्रीच्या दृष्टीने 'बार्बी' हा दुसरा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे.
आतापर्यंत 53 सिनेमाने केला बिलियन डॉलर्सचा पराक्रम
- एपी या वृत्तसंस्थेच्या आकडेवारीनुसार हॉलिवुडमध्ये आतापर्यंत 53 सिनेमांनी बिलियन डॉलर्स कमाईचा पराक्रम केला आहे.
- 'बार्बी' हा सिनेमा यामध्ये नव्याने समाविष्ट झाला आहे.
- महिलेने दिग्दर्शित केलेला 'बार्बी' सर्वाधिक कमाई करणारा पहिला हॉलिवुड ब्लॉकबस्टर ठरला.
- 'बार्बी' आधी वंडर वुमन्स या सिनेमाने 821.8 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती.
- 'बार्बी'ने कॅप्टन मार्व्हल या सिनेमाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. स्थानिक पातळीवर 'बार्बी'ने कॅप्टन मार्व्हल सिनेमाच्या तुलनेत अधिक कमाई केली. कॅप्टन मार्व्हलने 426.8 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती.