Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan Repayment: कर्ज वसुली करताना बँकांना मनमानी कारभार करता येणार नाही, अर्थमंत्र्यांचे निवेदन

Loan Repayment

अनेक ठिकाणी बुडीत कर्ज थकबाकीदारांशी व्यवहार करताना बँक कर्मचारी शेतकऱ्यांशी दुर्व्यवहार करतात अशा तक्रारी देशभरातून आल्या आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये बँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचेही प्रकार घडले आहेत. यावर प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी देखील आपत्ती जाहीर केली आणि असे प्रकार कदापीही खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्टीकरण दिले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले की, सर्व बँकांना, मग ते सार्वजनिक असो की खाजगी, कर्जाची वसुली करताना त्यांना कुठल्याही प्रकारे मनमानी कारभार करता येणार नाही. बँक कर्मचारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून अमानुषपणे कर्ज वसुली करत असून, त्यांची संपत्ती जप्त करत असल्याची तक्रार शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली होती. यावर उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की गरीब शेतकर्‍यांशी मानवी आणि संवेदनशील पद्धतीने व्यवहार करण्याचे निर्देश रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून बँका आणि वित्तीय संस्थाना दिले आहेत.

संवेदनशील बाब…

अनेक ठिकाणी बुडीत कर्ज थकबाकीदारांशी व्यवहार करताना बँक कर्मचारी शेतकऱ्यांशी दुर्व्यवहार करतात अशा तक्रारी देशभरातून आल्या आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये बँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचेही प्रकार घडले आहेत. यावर प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी देखील आपत्ती जाहीर केली आणि असे प्रकार कदापीही खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्टीकरण दिले.

याच मुद्द्यावर चर्चा सुरु असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हस्तक्षेप करत असे प्रकार घडू नयेत यासाठी RBI च्या माध्यमातून देशभरातील सरकारी, खासगी बँकांना आणि वित्तीय सहाय्य देणाऱ्या संस्थांना सूचित केले आहे असे त्या म्हणाल्या. मानवी मूल्यांना सर्वतोपरी ठेवण्यासाठी बँकांना निर्देश दिले जातील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.