बँक ऑफ महाराष्ट्रचे (Bank of Maharashtra) एमडी राजीव म्हणतात की जानेवारी-मार्च तिमाहीत बँक QIP (QIP - qualified institutional placement) द्वारे 1000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. याद्वारे सरकार हिस्सा विकणार आहे.
Table of contents [Show]
क्यूआयपी म्हणजे काय?
क्यूआयपी म्हणजे (QIP - qualified institutional placement). याद्वारे बँक मोठ्या गुंतवणूकदारांना भागभांडवल विकणार आहे. देशांतर्गत बाजारातून पैसे उभारण्यासाठी कंपन्या QIP चा वापर करतात. केंद्र सरकार बँक ऑफ महाराष्ट्रातील आपली हिस्सेदारी विकणार आहे. बँकेत सरकारचा 90 टक्के हिस्सा आहे. सेबीच्या नियमांनुसार पब्लिक होल्डिंग 25 टक्के असावी. त्यामुळे सरकार हा हिस्सा 85 टक्क्यांवर आणण्याच्या तयारीत आहे.
असा ठरतो क्यूआयपी
QIP ला मार्केट रेग्युलेटर म्हणजेच सेबी (SEBI – Securities and Exchange Board of India) ची मंजुरी आवश्यक नसते. QIP साठी, कंपनी नियमांनुसार शेअरची किंमत निश्चित करते. QIP ची किंमत 2 आठवड्यांच्या शेअरच्या सरासरी किमतीपेक्षा कमी असू शकत नाही.
क्यूआयपीसाठी कोण पात्र आहे?
QIP द्वारे विमा कंपन्या, वित्तीय संस्थांना शेअर्स जारी केले जाऊ शकतात. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल फंड यांनाही शेअर्स जारी केले जाऊ शकतात.
क्यूआयपीचा फायदा
QIP कंपन्यांकडे निधी उभारण्याचा सोपा आणि किफायतशीर मार्ग आहे. शेअरच्या चांगल्या किंमतींचा फायदाही गुंतवणूकदारांना होतो.