Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank of Baroda : बडोदा बँकेने केली 4 प्रकारच्या नवीन बचत खात्यांची सुरुवात; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Bank of Baroda :  बडोदा बँकेने केली 4 प्रकारच्या नवीन बचत खात्यांची सुरुवात; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Image Source : www.bankofbaroda.in

बँक ऑफ बडोदाने आपल्या विविध वयोगटातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन चार नवीन बचत खाती सुरू केली आहेत. त्यामध्ये बॉब लाईट (BoB LITE), बॉब ब्रो (BOB BRO), माय फॅमिली माय बँक(My family My Bank) आणि बडोदा NRI या खात्यांचा समावेश आहे.

बँक ऑफ बडोदाकडून सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांसाठी खास योजनांचे अनावरण केले आहे. "बडोदा बँकेसोबत उत्सवाचा आनंद साजरा करण्याच्या हेतूने बँकेकडून  घर, कार, वैयक्तिक, शिक्षण कर्जावर आकर्षक व्याजदर सवलतीची योजना, तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यासह बँकेने या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांसाठी 4 प्रकारच्या नवीन बचत खात्यांची सुरुवात केली आहे. जाणून घेऊयात या बचत खात्यांच्या वैशिष्ट्यांबद्ल...

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी सुविधा-

गौरी गणपतीपासून सणासुदीची सुरुवात होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ बडोदाने आपल्या विविध वयोगटातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन चार नवीन बचत खाती सुरू केली आहेत. त्यामध्ये बॉब लाईट (BoB LITE), बॉब ब्रो (BOB BRO), माय फॅमिली माय बँक(My family My Bank) आणि बडोदा NRI या खात्यांचा समावेश आहे. ही खाती ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करतात, ज्यामुळे बँकिंग अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनते. बँकेने आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी ही बचत खात्यांची श्रेणी सुरु करण्यात आली असल्याचा दावा केला आहे.

बॉब लाईट

बँक ऑफ बडोदाने नव्याने सुरुवात केलेल्या बचत खात्यामध्ये बॉब लाईट(BoB LITE ) या खात्याचा समावेश आहे.  या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे ग्राहकांना आयुष्यभर किमान शिल्लक रकमेवरती सुरू ठेवता येणार आहे. या बचत खात्यात जर किमान शिल्लक रक्कम नसेल तरही खाते चालू ठेवता येणार आहे.

बॉब ब्रो BOB BRO बचत खाते:

बँकेने खास विद्यार्थ्यांसाठी झिरो बँलन्सवर बचत खाते सुरू केले आहे.  16 ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना हे खाते उघडता येणार आहे. या खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी या खात्याच्या माध्यमातून अधिक मदत होणार असल्याचे बँक म्हणते.

माझे कुटुंब माझी बँक/ बॉब परिवार खाते:

बडोदा बँकेने ग्राहकांच्या कुटुंबाचा देखील विचार करून माझे कुटुंब माझी बँक या टॅग लाईन अंतर्गत बॉब परिवार नावाचे कुटुंबासाठी बचत खाते सुरू केले आहे. हे खाते सर्वसमावेशक बँकिंगची सुविधा शोधणाऱ्या  कुटुंबांसाठी योग्य असून आर्थिक ऐक्य साध्य करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगण्यात येत आहे.

बडोदा एनआरआय पॉवरपॅक बचत खाते-

बँकेने आपल्या अनिवासी भारतीय ग्राहकांचा विचार करून एनआरआय पॉवरपॅक हे खाते सुरू केले आहे. या बचत खात्याच्या माध्यमातून जगभरातील भारतीय नागरिकांसाठी बँकेना आपल्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.