Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI ATM: आता विना कार्ड काढा पैसे, या बॅंकेने सुरू केली UPI ATM ची सुविधा

UPI ATM

Image Source : www.npci.org.in

बँक ऑफ बडोदाने देशभरातील त्यांच्या एटीएममधून UPI ATM सुविधा सुरू केली आहे. या नवीन सुविधेमुळे ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड न वापरता एटीएममधून कॅश काढू शकणार आहेत. काय आहे प्रक्रिया, कसे काढायचे पैसे चला पाहू.

बँक ऑफ बडोदाने 8 सप्टेंबरला जारी केलेल्या निवदेनानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) सहकार्याने आणि NCR कॉर्पोरेशनद्वारे समर्थित UPI ATM लाँच करणारी सार्वजनिक क्षेत्रातील ही पहिली बँक ठरली आहे. बँक ऑफ बडोदाचे ग्राहक तसेच कोणत्याही यूपीआय सक्षम असलेल्या मोबाईल अ‍ॅपचा वापर करुन सर्व बॅंकांचे ग्राहक डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड  न वापरता या एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. यासाठी बॅंकने 6000 एटीएमवर UPI ATM ची सुविधा सुरू केली आहे.

विना अडथळा काढा पैसे

निवेदनानुसार, इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल (ICCW) टेक्नाॅलाॅजीचा वापर करुन, जे ATM द्वारे कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा देते, त्यामुळे UPI ATM वरुन विना अडथळा QR-आधारित कॅश काढू शकतो. तसेच, यासाठी कोणत्याही कार्डची गरज लागत नाही.

UPI ATM सुविधा कोणासाठी?

बँक ऑफ बडोदाचे ग्राहक तसेच सर्व सहभागी जारीकर्त्या बँकांचे ग्राहक कोणत्याही UPI सक्षम मोबाईल अ‍ॅपवरुन त्यांचे डेबिट कार्ड न वापरता बँक ऑफ बडोदा UPI एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. 

UPI ATM मधून पैसे काढायचे कसे?

  • स्टेप 1: ATM स्क्रीनवर "UPI Cardless Cash" पर्याय निवडा.
  • स्टेप 2: पैसे काढण्याची रक्कम निवडा.
  • स्टेप 3: UPI अ‍ॅप वापरून ATM स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करा.
  • स्टेप 4: एका UPI आयडीशी अनेक बँक खाती लिंक असल्यास, पैसे काढण्यासाठी बँक खाते निवडा.
  • स्टेप 5: UPI पिन वापरून व्यवहाराची पुष्टी करा आणि कॅश कलेक्ट करा.

पैसे काढणे झाले सहज

UPI शी लिंक असलेल्या अनेक खात्यांमधून ग्राहक पैसे काढू शकतात. जो UPI ATM सुविधेचा मुख्य फायदा आहे. प्रत्येक व्यवहारासाठी नवीन QR कोड जनरेट होतो, त्यामुळे सुरक्षेची हमी आहे. तसेच, UPI ATM वरुन व्यवहार करणे अधिक जलद, सोपे आणि सुरक्षित आहे. त्यामुळे एखाद्यावेळी डेबिट कार्डसोबत नसल्यास, तुम्हाला मोबाईल वापरुनही पैसे काढता येणार आहेत.