BoB ने सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कारण, BoB के संग त्योहार की उमंग फेस्टिव्ह कॅम्पेनद्वारे बॅंक ग्राहकांना आकर्षक व्याजदर देत आहे. तसेच, ग्राहकांना चार सेव्हिंग खात्याचा लाभ घेता येणार आहे. याचबरोबर सणासुदीत बॅंकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना ऑफर्सचा लाभ घेता यावा यासाठी बॅंकेने इलेक्ट्राॅनिक्स, ट्रॅव्हल आणि फूडमधील टाॅप ब्रॅण्डशी करार केला असल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे.
या लोनवर मिळतोय आकर्षक व्याजदर
बँक ऑफ बडोदा होम लोन 8.40 टक्के वार्षिक व्याजदराने देत आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. कारण, बॅंकेने प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. तसेच, तुम्ही कार लोन घेणार असल्यास ते तुम्हाला 8.70 टक्के वार्षिक व्याजदराने मिळणार आहे. यावर देखील प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.
बॅंक शैक्षणिक लोनवर 8.55 टक्के व्याजदर आकारत आहे. तर यावर 60 बेसिस पाॅईंट्सची सूट मिळणार आहे. तसेच, देशातील प्रमुख शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्याने प्रवेश घेतला असल्यास, त्याला विना तारण लोन घेता येणार आहे.
तसेच, ग्राहकांना पर्सनल लोन 80 बेसिस पाॅईंटसच्या सवलतीसह 10.10 टक्के दरावर देण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहकांना पर्सनल लोनसाठी प्रक्रिया शुल्क देण्याची गरज नाही. या ऑफरद्वारे ग्राहकांना 20 लाखापर्यंत लोन घेता येणार आहे. याचबरोबर ग्राहकांना या ऑफर्सचा लाभ 31 डिसेंबर, 2023 पर्यंत घेता येणार आहे.
नवीन खात्यांचा ग्राहकांना घेता येणार लाभ
बॅंकेने ग्राहकांना फायदा व्हावा यासाठी नवीन चार सेव्हिंग्ज अकाउंट सुरू केले आहे. यामध्ये लाईट सेव्हिंग्ज अकाउंट- या अकाउंटमध्ये आयुष्यभरासाठी मिनिमम बॅलन्स ठेवायची गरज राहणार नाही. BRO सेव्हिंग्ज अकाउंट- हे खास विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आले असून झीरो सेव्हिंग्ज बॅलन्स अकाउंट आहे.
यानंतर बॅंकेने परिवार अकाउंट आणले आहे, याद्वारे सर्व कुटुंबीयांना त्यांच्या गरजा भागवता येणार आहे. तसेच, NRI पावरपॅक अकाउंटही बॅंकेने सुरू केले आहे. याशिवाय बॅंकेने रिकरिंग डिपाॅझिटची योजनाही लाॅंच केली आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळात या अकाउंटवर ग्राहकांना आकर्षक फायद्यांचा लाभ घेता येणार आहे.