Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan Options: बँक की फिनटेक... कोणाकडून घ्यावे कर्ज? जाणून घ्या कर्ज काढण्याची योग्य पद्धत

Bank Loan

Image Source : smartcoin.co.in/

सध्या बँकेसोबतच आता फिनेटक अ‍ॅपच्या माध्यमातून देखील कर्ज उपलब्ध होते. बँक, फिनेटक अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

अनेकदा आर्थिक बजेट बिघडले की आपण कर्ज काढत असतो. अगदी गाडी खरेदी करण्यापासून ते घर खरेदी करण्यापर्यंत असे अनेक व्यवहार कर्जाच्या मदतीने करणे सोपे जाते. गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, कार खरेदी करण्यासाठी कर्ज असे कर्जाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या प्रकारचे कर्ज काढण्यासाठी प्रामुख्याने पारंपारिक पद्धतीने बँकेत धाव घेतली जाते. बँक अथवा वित्तीय संस्थेकडून अशा प्रकारचे कर्ज घेतले जाते. मात्र, गेल्याकाही वर्षात  ऑनलाईन माध्यमातून अवघ्या काही तासांमध्ये कर्ज उपलब्ध होत आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज उपलब्ध करणाऱ्या फिनेटक (Financial Technology) कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे.   

मात्र, पारंपारिक पद्धत व ऑनलाईन पद्धतीने कर्ज काढण्याचे फायद्यांसोबतच तोटे देखील आहेत. तुमच्यासाठी यापैकी  कोणती कर्जाची पद्धत योग्य असू शकते? व याचे फायदे तोटे काय आहेत? त्याविषयी या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.   

कर्जाची पारंपारिक पद्धत – सर्वसाधारणपणे बँक व इतर वित्तीय संस्थेद्वारे पारंपारिक पद्धतीने कर्ज दिले जाते. यासाठी कर्जदाराला स्वतः बँकेत जाऊन लिखित स्वरूपात अर्ज करावा लागतो.  अर्ज-कागदपत्रांची मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तसेच, ही वेळखाऊ प्रक्रिया समजली जाते.   

कर्जाची पारंपारिक पद्धत तुमच्यासाठी कधी ठरेल योग्य?   

जास्त रक्कमेची आवश्यकता – तुम्हाला जर मोठे कर्ज काढायचे असल्यास अशावेळी ही पद्धत योग्य ठरू शकते. बँका तुम्हाला जास्त रक्कमेसाठी तयार होतात. तसेच, तुम्हाला कर्जाच्या संदर्भातील नियम व अटींबाबत योग्य माहिती देखील घेता येते.   

क्रेडिट स्कोर चांगला – तुमचे आतापर्यंतचे कर्जाचे व्यवहार चांगले असतील, तुम्ही यापूर्वी काढलेल्या कर्जाचे हफ्ते नियमितरित्या भरत असाल, तर अशावेळी पारंपारिक बँका तुम्हाला सहज कर्ज देऊ शकतात.   

दीर्घकालीन प्रक्रियेसाठी तयार असाल तर – सर्वसाधारणपणे कर्ज काढताना बँकेतून अनेक चक्करा माराव्या लागतात. कर्जासाठी अर्ज करणे कागदपत्रांची तपासणी, तारण अशी लांबलचक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तुम्ही जर ही दीर्घकालीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबू शकत असाल तर पारंपारिक पद्धतीने कर्ज काढू शकता.   

कर्ज काढण्याची नवीन पद्धत तुमच्यासाठी कधी ठरेल योग्य?   

त्वरित पैशांची गरज – सध्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, जे तुम्हाला अगदी काही तासांमध्ये कर्ज उपलब्ध करून देतात. तुम्हाला जर पैशांची गरज असल्यास कर्ज काढण्याची ऑनलाईन पद्धत तुमच्यासाठी योग्य ठरेल.   

कमी कर्ज – घर, गाडी खरेदी करण्यासाठी मोठ्या रक्कमेची गरज असते. अशावेळी बँक व वित्तीय संस्था अशा पारंपारिक पद्धतीने कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात व कमी रक्कमेच्या कर्जाची गरज असल्यास असे फिनेटक प्लॅटफॉर्म उपयोगी ठरतात.   

कागदपत्र – तुम्हाला जर अर्ज, कागदपत्रांची भली मोठी प्रोसेस टाळायची असेल व वेळ वाचावयाच असेल तर अशावेळी कर्जाची ऑनलाईन पद्धत फायद्याची ठरते.   

पारंपारिक व नवीन कर्जाच्या पद्धतीमधील मूलभूत फरक   

पारंपारिक कर्ज पद्धत   

डिजिटल कर्ज पद्धत   

अर्जाची प्रक्रिया   

किचकट व दीर्घकालीन   

सोपी व जलद   

कर्ज मंजूरी   

अनेक दिवस लागतात   

अवघ्या काही तासात   

व्याजदर   

व्याजदर जास्त असतो.   

व्याजदर कंपनीवर अवलंबून   

कर्जमंजूरी शुल्क   

जास्त   

पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत कमी   

कागदपत्र   

जास्त कागदपत्रांची गरज   

मर्यादित कागदपत्रे   

तुमच्यासाठी कोणती कर्जाची पद्धत योग्य?   

तुमच्यासाठी कोणती कर्जाची पद्धत योग्य ठरू शकते हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. तुम्हाला जर त्वरित व कमी रक्कमेच्या कर्जाची गरज असल्यास डिजिटल पद्धत फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, कर्ज मंजूरीसाठी लागणारे शुल्क देखील कमी असते. परंतु, तुम्हाला जास्त रक्कमेच्या कर्ज हवे असल्यास तुम्ही पारंपारिक पद्धतीने बँकेतून कर्ज घेऊ शकता.