ऑक्टोबर महिना सण आणि उत्सवांची रेलचेल घेऊन येणारा महिना आहे. हा महिना जेमतम काही दिवसांवर आला आहे. सप्टेंबर संपायला फक्त तीन दिवसांचा अवधी आहे. अशात या महिन्यात देशभरात उत्सवी वातावरण असल्याने या महिन्यातल्या अनेक तारखा तुम्हाला लाल रंगात असलेल्या पाहायला मिळतील. अशात ऑक्टोबरची सुरूवातच रविवारने होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असल्याने पहिले दोन दिवस तर सुट्टी आहे हे नक्की. अशात या महिन्यात तुम्हाला बँकेची काही कामं करायची असल्यास त्याचं नियोजन तुम्हाला त्या पद्धतीने करावं लागेल.देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही असाल किंवा देशात तुम्हाला तुमच्या कामानिमित्त जावं लागणार असेल तर त्या दिवशी त्या भागात बँक किंवा सरकारी कार्यालयं सुरू आहेत का हे तुम्हाला पाहावं लागेल. तेव्हा ऑक्टोबर 2023 रोजी कोणत्या भागात कधी असतील बँका किंवा सरकारी कार्यालयं बंद हे आपण पाहणार आहोत.
ऑक्टोबरच्या या तारखांना असणार देशात बँका बंद
2 ऑक्टोबर (सोमवार) - गांधी जयंती
14 ऑक्टोबर (शनिवार) - महालया - कोलकातामध्ये बंद
18 ऑक्टोबर - (बुधवार) - कटी बिहू - आसाममध्ये बँका बंद
19 ऑक्टोबर शनिवार - दुर्गा पूजा (महा सप्तमी) - त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि बंगालमध्ये बँका बंद.
23 ऑक्टोबर (सोमवार) – दसरा (महानवमी)/आयुधा पूजा/दुर्गा पूजा/विजय दशमी – त्रिपुरा, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, जरकाखंड, बिहारमध्ये बँका बंद आहेत.
24 ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा/दसरा (विजयादशमी)/दुर्गा पूजा – आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद.
25 ऑक्टोबर (बुधवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद.
26 ऑक्टोबर (गुरुवार) - दुर्गा पूजा (दसैन) - सिक्कीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद.
27 ऑक्टोबर, (शुक्रवार) दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद आहेत.
28 ऑक्टोबर (शनिवार) – लक्ष्मी पूजा – बंगालमध्ये बँका बंद आहेत.
31 ऑक्टोबर (मंगळवार)- सरदार वल्लभ भाई पटेल जयंती