ऑगस्ट महिन्यात देशभरात 14 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. यात दोन शनिवार आणि चार रविवार यांचा समावेश आहे. बँकेची कामे वेळेत करण्यासाठी ग्राहकांना रिझर्व्ह बँकेचे हॉलिडे कॅलेंडर समजून घ्यावे लागेल.
ऑगस्ट 2023 या महिन्यात विभागनिहाय 8 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. ऑगस्टमध्ये 6, 13, 20, 27 या दिवशी रविवार असून बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 12 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट रोजी अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
ऑगस्ट महिन्यात बँकांना पहिली सार्वजनिक सुट्टी मंगळवार 8 ऑगस्ट 2023 रोजी आहे. गंगटोकमधील बँकांसाठी स्थानिक पातळीवर या दिवशी सुट्टी राहील.त्यानंतर मंगळवार 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन आहे. त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असेल. देशभरात सर्वच बँकांना स्वातंत्र्य दिनाची सुट्टी राहील.
बुधवारी 16 ऑगस्ट 2023 रोजी पारशी नववर्ष असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी राहील. 18 ऑगस्ट रोजी श्रीमंता शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीत बँकांना सुट्टी राहील.
28 आणि 29 ऑगस्ट 2023 रोजी ओणम आणि थिरुओणम सणानिमित्त तिरुवनंतरपुरममधील बँकांना सलग दोन दिवस सुट्टी राहील. 30 ऑगस्ट 2023 रोजी रक्षा बंधननिमित्त जयपूर आणि शिमलामधील बँकांना रजा असेल. 31 ऑगस्ट 2023 रोजी रक्षा बंधन, श्री नारायण गुरु जयंतीनिमित्ती गंगटोक, कानपूर, लखनऊ आणि तिरुवनंतपुरम येथे बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
जुलै महिन्यात एकूण 8 बँक हॉलिडे
रिझर्व्ह बँकेच्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट्स नुसार जुलै महिन्यात एकूण 8 बँक हॉलिडे आहेत. यात 5 जुलै, 6 जुलै, 11 जुलै, 13 जुलै, 17, 21 आणि 28 जुलै रोजी बँकांन सुटी असेल. याशिवाय 2, 9, 16 , 23 आणि 30 जुलै रोजी रविवार आहे. 8 जुलै आणि 22 जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार बँका बंद राहतील. 28 जुलै रोजी महाराष्ट्रासह जम्मू कश्मिर आणि केरळमध्ये बँकांना ईदची सार्वजनिक सुटी आहे. 29 जुलै रोजी उर्वरित राज्यांमध्ये बँका ईद निमित्त बंद राहतील.