जुलै महिन्यात राष्ट्रीय स्तरावर एकूण 14 दिवस बँकांचे कामकाज बंद असेल. रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार बँकांना जुलै महिन्यात स्थानिक पातळीवर 8 दिवस बँकांना सण उत्सवानिमित्त सुट्टी असेल. जुलै महिन्यात एकूण 4 रविवार आणि 2 शनिवार बँका बंद राहतील. असे एकूण 14 दिवस बँकांचे कामकाज बंद असेल. महाराष्ट्रात मात्र 29 जुलै रोजी मोहरमनिमित्त बँक हॉलिडे असेल.
रिझर्व्ह बँकेच्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट्स नुसार जुलै महिन्यात एकूण 8 बँक हॉलिडे आहेत. यात 5 जुलै, 6 जुलै, 11 जुलै, 13 जुलै, 17, 21 आणि 28 जुलै रोजी बँकांन सुटी असेल. याशिवाय 2, 9, 16 , 23 आणि 30 जुलै रोजी रविवार आहे. 8 जुलै आणि 22 जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार बँका बंद राहतील.
28 जुलै रोजी महाराष्ट्रासह जम्मू कश्मिर आणि केरळमध्ये बँकांना ईदची सार्वजनिक सुटी आहे. 29 जुलै रोजी उर्वरित राज्यांमध्ये बँका ईद निमित्त बंद राहतील.
जून महिन्यात पाच हॉलिडे
रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार जून महिन्यात राष्ट्रीय स्तरावर पाच बँक हॉलडे आहेत. यात 15 जून 2023 रोजी राजा संक्रातीनिमित्त मिझोरम आणि ओदिशामध्ये बँकांना सार्वजनिक सुट्टी आहे. 20 जून 2023 रोजी रथयात्रेनिमित्त ओदिशामध्ये बँकांना सुट्टी असेल. 26 जून 2023 रोजी त्रिपुरात बँकांना खर्ची पुजेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असेल. 28 जून रोजी बकरी ईदनिमित्त केरळ, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मिरमध्ये बँकांना सुट्टी आहे.29 जून 2023 रोजी केरळ, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मिर वगळता इतर राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.