भारतीय नौदलाच्या आयएनस विक्रांत या विमान वाहू युद्ध नौकेचा समस्त भारतीयांना अभिमान आहे. 1997 ही युद्ध नौका सेवेतून निवृत्त झाल्यानंतर 2014 मध्ये ती स्क्रॅप करण्यात आली. याच युद्धनौकेला श्रद्धांजली म्हणून बंगळुरू वॉच कंपनीने या युद्धनौकेच्या धातूपासून आकर्षक अशा 70 घड्याळांची निर्मिती केली आहे.
INS विक्रांत युद्धनौका-
INS विक्रांत R11 या युद्ध नौकेने 1961 ते 1997 या कालावधी भारतीय नौदलात आपली सेवा बजावली. तसेच समुद्रामध्ये गस्त घालणाऱ्या या विमानवाहू युद्धनौकेने 1971 च्या भारत पाक युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. दरम्यान, सेवा निवृत्तीनंतर 2014 मध्ये भंगारात काढलेल्या या गौरवशाली युद्ध नौकेच्या धातूपासून बंगळुरू वॉच कंपनीने 70 विशेष घड्याळ्यांची निर्मिती केली आहे. ही घड्याळे कंपनीकडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती HEFTY.art चे संस्थापक कनिष्क छाब्रिया यांनी दिली आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये-
आयएनएस विक्रांतच्या धातू पासून तयार करण्यात आलेली ही घड्याळ दिसायला आकर्षक आणि युनिक आहेत. कंपनीने या घड्याळास MACH 1 Admiral असे नाव देण्यात आले आहे. कंपनीकडून केवळ 70 अशी अद्वितीय घडाळे तयार करण्यात आली आहेत. अॅडमिरल या घड्याळाची डायल INS विक्रांत R11 च्या धातूपासून तयार करण्यात आली आहे. तसेच घड्याळ्याचा लूक पाहिला तर डायलचा कलर हा नौदलाचे प्रतिक म्हणून ग्रे देण्यात आला आहे. घड्याळ्यावरील आकड्यांचे स्थान हे समुद्राच्या निळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच घड्याळाच्या डायलवर विक्रांतची एक प्रतिकृती दृश्यमान करण्यात आली आहे.
NFT च्या माध्यमातून होणार व्यवहार
प्रत्येक घड्याळ एक युनिक असून याची विक्री ही डिजिटल NFT (नॉन फंजिबल टोकन) या चलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे. NFT एक डिजिटल करन्सी आहे. कंपनीकडून सध्या या घडाळ्याचे बाजार मुल्य 2 लाख 12 हजार रुपये इतके ठेवण्यात आले आहे. याची बुकिंग अथवा खरेदी कंपनीच्या संकेतसंस्थळावरून करता येणार आहे.