भारतातील लोकप्रिय टू व्हिलर ब्रँड बजाजने आता CNG Bike बाजारात आणणार असल्याचे संकेत दिले आहेत. CNG हा पेट्रोलच्या वाढत्या किमतींसाठी एक स्वस्त पर्याय आहे. अशा CNG Bike पर्यायामुळे ग्राहकांसाठी इंधनाच्या किमती सुमारे 50% कमी होतील.सीएनजी बजाज मोटारसायकल हे वाढत्या पेट्रोल किमतींशी सातत्याने झगडणाऱ्या सरकारसाठीही एक उत्तम पर्याय ठरेल, असा विश्वास बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला.
ग्राहकांची पेट्रोल - डिझेलकडे पाठ
यावेळी बजाज म्हणाले कि , खरेदीदार इलेक्ट्रिक वाहन पर्यायांकडे वळत असल्याने एंट्री-लेव्हल इंटर्नल कम्बशन इंजिन बाईक (100cc) ची विक्री आगामी सणासुदीच्या हंगामात वाढताना दिसत नाही. इलेक्ट्रिक वाहनांमुळे लोकांचा पेट्रोल व डिझेल वर चालणाऱ्या' बाइक्समध्ये रस कमी होत आहे. ऑगस्टमध्ये, बजाज ऑटोच्या एकूण दुचाकी विक्रीत 20% घट होऊन ऑगस्ट 2022 मध्ये 3,55,625 युनिट्सची विक्री 2,85,031 युनिट्सवर आली. ऑगस्ट 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 2, 56,755 युनिटच्या तुलनेत मागील महिन्यात एकूण देशांतर्गत विक्री 20% ने घसरून 2,05,100 युनिट्सवर आली. त्यांची एकूण वाहन निर्यात वर्षभराच्या तुलनेत 6% कमी झाल्याचे राजीव बजाज यांनी सांगितले.
100cc ते 125 cc च्या बाईक्सचे मोठे मार्केट
बजाज ऑटोने सांगितले होते की त्यांच्या विक्रीतील 70% पेक्षा जास्त 125 सीसी बाईक आहेत.,बजाज ऑटोच्या वेबसाइटनुसार, कंपनीकडे 100 ते 125 cc एंट्री लेव्हल सेगमेंटमधील सात बाईक मॉडेल्स आहेत, ज्यांची किंमत 67,000 रुपये आणि 1,07,000 रुपयाच्या दरम्यान आहे.
सीएनजी बाईक्सचे फायदे:
- पर्यावरणपूरक: CNG हे स्वच्छ इंधन आहे.
- CNG पेट्रोल आणि LPG पेक्षा स्वस्त आहे.
- कार इंजिनसाठी सीएनजी चांगले आहे.
- पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी अधिक सुरक्षित आहे.
- इंजिनच्या स्मूथ फंक्शनिंगसाठी CNG योग्य पर्याय आहे
भारतातील ऑटो क्षेत्रात अग्रणी असलेल्या बजाज कंपनीने दैनंदिन वापरातल्या बाईक्स CNG मध्ये उत्पादित करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच ऑटो क्षेत्रात होणाऱ्या नवीन बदलांचा संकेत आहे .