मोटारसायकल आणि तीनचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या बजाज ऑटो कंपनीने (Bajaj Auto Company) सोमवारी (दि. 27 जून) खुल्या बाजारातून प्रति शेअर (Bajaj Auto stock Price) 4600 रूपये या किमतीने 2,500 कोटी रूपयांच्या शेअर बायबॅकला (Bajaj Auto Share Buyback) मान्यता दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे दुपारच्या सत्रात बीएसई (BSE) वर बजाज ऑटोचे शेअर्स 0.7 टक्क्यांनी वाढून प्रत्येकी 3,840 रूपये झाले होते.
बजाज ऑटो कंपनीच्या (Bajaj Auto Company) संचालक मंडळाने या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रस्तावित शेअर बायबॅकचा निर्णय घेण्यासाठीची बैठक पुढे ढकलली होती. त्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळाची सोमवारी (दि. 27 जून) बैठक झाली. या बैठकीत कंपनीच्या पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्सच्या बायबॅकच्या प्रस्तावावर चर्चा झाली. बैठकीत 2,500 कोटी रूपयांच्या शेअर बायबॅकला मान्यता देण्यात आली आहे.
बजाज ऑटोने बैठकीबाबत दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कंपनीच्या 10 रूपये दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स बायबॅक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्टॉक एक्स्चेंज यंत्रणेद्वारे कंपनीचे विद्यमान भागधारक 4,600 रूपये प्रति इक्विटी शेअर (Bajaj Auto stock Price) खरेदी करू शकतात. तसेच यासाठी एकूण 2,500 कोटी रूपयांच्या शेअर बायबॅकला (Bajaj Auto Share Buyback) मान्यता देण्यात आली आहे.
कंपनीने असे ही म्हटले आहे की, 27 जून 2022 पर्यंत कंपनीकडे पेड-अप शेअर कॅपिटलच्या अंदाजे 1.88 टक्के याप्रमाणे 54,34,782 इक्विटी शेअर्स (प्रस्तावित बायबॅक शेअर्स) उपलब्ध असतील. बायबॅक विक्रीतून उपलब्ध झालेल्या एकूण रकमेपैकी कंपनी फक्त 50 टक्के म्हणजे 1250 कोटी रूपये वापरणार आहे. शेअर बायबॅक ही एक प्रक्रिया आहे; जेव्हा एखादी कंपनी खुल्या बाजारात उपलब्ध शेअर्सची संख्या कमी करण्यासाठी स्वतःचे आऊटस्टॅण्डिंग शेअर्स खरेदी करते.
image source - https://bit.ly/3ynHRnl