स्टॉक एक्स्चेंजला (Stock exchange) पतंजली फूड्सनं माहिती दिली आहे. पतंजली फूड्सनं सांगितलं, की प्रवर्तकांना 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 25,339,640 इक्विटीची (Equity) विक्री करायची आहे. हे कंपनीच्या एकूण पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 7 टक्के आहे. ओव्हर सबस्क्रिप्शन झाल्यास एकूण पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 2 टक्क्याचं प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त 7,239,897 शेअर्स विकण्याची तरतूद असणार आहे. अशा प्रकारे एकूण ओएफएस (Offer for sale) 32,579,537 समभाग (9 टक्क्यापर्यंत) असेल.
प्रवर्तकाजवळ असू शकतात कंपनीचे जास्तीत जास्त 75 टक्के शेअर्स
पतंजली आयुर्वेदाचे पतंजली फूड्समध्ये 30 जूनपर्यंत 14,25,00,000 शेअर्स किंवा 39.37 टक्के स्टेक होते. एकूण प्रवर्तक गटाकडे कंपनीचे 29,25,76,299 शेअर्स किंवा 80.82 टक्के भागभांडवल आहे, जे तुलनेनं जास्त आहे. किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग नियमांनुसार, प्रवर्तक कंपनीमध्ये 75 टक्क्यांची पातळी धारण करू शकतात.
दोन दिवसांसाठी...
स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगनुसार, ओएफएस हा दोन दिवसांसाठी उघडण्यात आला आहे. या अंतर्गत किरकोळ नसलेले गुंतवणूकदार आज 13 जुलै रोजी गुंतवणूक करू शकणार आहेत. तरकिरकोळ गुंतवणूकदारांसाठी उद्या म्हणजेच 14 जुलै रोजी उघडणार आहे. मनी कंट्रोलनं याविषयीचं वृत्त दिलं आहे.
#PatanjaliFoods: Patanjali Foods ने गुरुवार को 2 दिन के लिए OFS लॉन्च करेगी। इस OFS के तहत कंपनी के प्रमोटर अपनी करीब 9 % हिस्सेदारी बेचेंगे। इस हिस्सेदारी को 1,000 रुपये प्रति शेयर के भाव पर बेचा जाएगा, जो इसके मौजूदा बाजार भाव से करीब 18.36% कम है
— Moneycontrol Hindi (@MoneycontrolH) July 12, 2023
?https://t.co/m4OZRsTtC8 pic.twitter.com/CPHaxzOC5b
ओएफएस म्हणजे काय?
ओएफएस स्टॉक एक्स्चेंजच्या वेगळ्या विंडोवर ट्रेडिंग तासांदरम्यान सकाळी 9:15 वाजता सुरू होईल आणि त्याच तारखेला दुपारी 3.30 वाजता बंद होईल. ऑफर फॉर सेल हा सार्वजनिकपणे व्यापार करणाऱ्या कंपन्यांसाठी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे शेअर्स विकण्याचा एक सोयीस्कर मार्ग आहे. आपली उद्दिष्टं साध्य करण्यासाठी जेव्हा एखादी कंपनी अतिरिक्त भांडवलाची गरज असते तेव्हा ती ऑफर फॉर सेल (OFS) वापरू शकते.