तैवानमधील इलेट्राॅनिक्स मार्केटमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ASUS ने शुक्रवारी म्हणजेच 1 सप्टेंबरला क्रोमबुक CX ची सिरिज भारतामध्ये लाॅंच केली आहे. क्रोमबुक CX1 14 आणि 15 इंच साईजमध्ये उपलब्ध आहे. तसेच, ते खूप हलके असून त्याची किंमतही भारतीयांच्या बजेटमध्ये असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सध्या या क्रोमबुकची किंमत 21,990 पासून सुरू आहे. तर मर्यादित अवधीसाठी फ्लिपकार्टवरुन फक्त 18,990 मध्ये खरेदी करता येणार आहे.
मिळेल जबरदस्त बॅटरी बॅकअप
फिचर्सविषयी बोलायचे झाल्यास, कंपनीने क्रोमबुकला इंटेल सेलेरॉन N4500 प्रोसेसर दिले आहे. तसेच, इमर्सिव्ह ले-फ्लॅट डिस्प्ले, वाय-फाय 6 आणि 11 तासांसाठी चालणारी बॅटरी, यामध्ये तुम्हाला हाय क्वालिटी 3-सेल 50Wh च्या बॅटरी पॅकसह मिळणार आहे. त्यामुळे वारंवार चार्ज करायचे टेन्शन राहणार नाही. तसेच, 45W फास्ट USB-C टाईप चार्जर मिळणार आहे. फ्लिप टचस्क्रीन आणि नॉन-फ्लिप व्हेरियंटमध्ये 14-इंच आणि 15-इंच स्क्रीन पर्यायांमध्ये फुल-एचडी डिस्प्लेसह उपलब्ध आहेत. तसेच, तुम्हाला यात 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.
रॅम वाढवण्याची सुविधा उपलब्ध
एक्सटेंड बॅटरी लाइफ आणि मिलिटरी ग्रेड ड्युरेब्लिटीसह, नवीन क्रोमबुक्स बजेटमध्ये तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी प्रदान करतात. ASUS इंडियाच्या कमर्शियल पीसी आणि स्मार्टफोन्स सिस्टीम बिझनेस ग्रुपचे उपाध्यक्ष दिनेश शर्मा यांनी सांगितले की, नवीन रेंजमध्ये एनहान्स्ड रॅम आणि स्टोरेज पर्याय देण्यात आले आहेत, तर डिफॉल्ट टायटन सी चिप मजबूत सुरक्षेसाठी हार्डवेअर एन्क्रिप्शनची सुविधा देणार आहे.
यासाठी क्रोमबुक आहे बेस्ट
तसेच या लॅपटाॅपमध्ये इमर्सिव्ह फुल-एचडी डिस्प्ले असून यामध्ये वाइड व्ह्यू टेक्नॉलॉजी आणि टचस्क्रीन, क्रिस्प स्टिरिओ ऑडिओ आणि 720p HD कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये गुगल वर्कस्पेस, गुगल प्ले स्टोअर, अँड्रॉइड अॅप्स, गुगल असिस्टंट आणि 100GB गुगल वन क्लाउड स्टोरेजची पूर्ण क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये लॅपटाॅप घ्यायचा प्लॅन करत असल्यास, क्रोमबुक CX1 सिरिज तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. कारण, यात बरेच फिचर्स तुम्हाला वापरायला मिळणार आहेत.