Asci issues new disclaimer norms for TV, digital ads: अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने (ASCI: Advertising Standards Council of India) जाहिरातींद्वारे ग्राहकांना त्यांची उत्पादने खरेदी करण्यासाठी आकर्षित करणाऱ्या कंपन्यांवर अधिक कडक केले आहे. कंपन्यांबरोबरच इन्फ्लुएंसरनाही हे नियम लागू होणार आहेत. एएससीआयने जाहिरातीसोबत ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात डिस्क्लेमर स्पष्टपणे प्रदर्शित करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. याद्वारे ग्राहकांना उत्पादनाची योग्य माहिती मिळू शकते आणि कंपन्या त्यांची दिशाभूल होऊ शकणार नाही. गेल्या तीन वर्षांत, एएससीआयने 800 हून अधिक जाहिरातींवर कारवाई केली आहे, ज्या डिस्क्लेमर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे.
डिस्क्सेमरचे नियम कठोर करण्यामागील कारण? (tightens disclaimer guidelines)
डिजिटल मार्केटिंग फर्म आइक्यूब वायरचे ( iCubesWire) संस्थापक आणि सीईओ (CEO: Chief Executive Officer) साहिल चोप्रा म्हणाले की, एएससीआयने डिस्क्लेमर मार्गदर्शक तत्त्वे कडक केली आहेत, कारण 80 टक्के ग्राहक किंवा प्रेक्षक हे जाहिरातींमधील डिस्क्लेमरकडे लक्षच देत नाहीत. अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने (ASCI) जाहिरातींमध्ये केलेल्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी वापरल्या जाणार्या अस्वीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे अद्ययावत म्हणजे अपडेट केली आहेत. एएससीआयने म्हटले आहे की, ग्राहकांना सादर केलेली सर्व माहिती वाचता आणि समजून घेता यावी यासाठी जाहिरातींमध्ये केलेल्या दाव्यांचे योग्य स्पष्टीकरण आणि समर्थन करण्यासाठी योग्य डिस्क्लेमर वापरले जावे.
अस्वीकरण हा जाहिरातींचा एक महत्त्वाचा भाग आहे, जे जाहिरातीमध्ये केलेल्या दाव्यांचे स्पष्टीकरण देतात आणि ग्राहकांची दिशाभूल करण्याचा धोका कमी करतात. अलीकडेच, जाहिरातींमध्ये अस्वीकरणाची प्रभावीता ओळखण्यासाठी अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने (ASCI) एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये ग्राहक अशी तक्रार करताना आढळले आहेत की, डिस्क्लेमरचा भाग वाचता येत नाही, व्यवस्थित दिसतही नाही. तर, ऑडियो डिस्क्लेमर हा इतक्या फास्ट बोलला गेलेला असतो की त्यातील शब्द स्पष्टपणे समजत नाहीत. त्यामुळे ग्राहकापर्यंत डिस्क्लेमरमधील जाहिरातीबाबतची आणि प्रोडक्ट किंवा सेवेबद्दलची महत्त्वाची गोष्ट पोहोचत नाही. यामुळे अनेकदा प्रोडक्टविषयी तक्रारी येतात कधी ग्राहक न्यायालयात केस उभा राहते, त्यात जवळपास 50 टक्केवेळा डिस्क्लेमर हा मुद्दा येतो. जर, ग्राहक डिस्क्लेमर वाचू शकत नसतील, तर जाहिरातींमध्ये केलेल्या दाव्यांमुळे त्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळेच डिस्क्लेमरचा नियम कडक करण्यात आलेला आहे.
डिस्क्लेमर नियम न पाळल्यास? (If the disclaimer rules are not followed?)
सीईओ साहिल चोप्रा म्हणाले की, एएससीआयने नैतिक जाहिरात सराव सुनिश्चित करण्यासाठी डिस्क्लेमर मार्गदर्शक तत्त्वे कडक केली आहेत. जाहिरातदारांनी आता हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की डिस्क्लेमर
संक्षिप्त आहेत. याशिवाय, जाहिरातीच्या एका फ्रेममध्ये एकापेक्षा जास्त डिस्क्लेमर नसावेत आणि प्रत्येक डिस्क्लेमर फक्त दोन ओळींमध्ये असावा. या डिस्क्लेमर ओळी चार सेकंद स्क्रीनवर राहतील. यामुळे ग्राहक उत्पादनाबाबत अधिक जागरूक होतील आणि त्यांची फसवणूक होणार नाही.
एएससीआयचा डिस्क्लेमर नियम मोडल्यास 10 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. जर, तीनपेक्षा जास्तवेळा नियम मोडताना आढळल्यास 50 लाखांचा दंड आकारला जाणार आहे. इन्फ्लुएंसर्सनी डिस्क्लेमर नियम पाळले नाहीत, तर त्यांच्याकडून 6 लाखांचा दंड आकारला जाणार आहे.