Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Computer Courses Useful For Jobs : विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर क्लासेस योजना सरकारकडून राबविल्या जातात का?

computer Course

Computer classes: फक्त नोकरीच नाही तर दैनंदिन जीवनात अशी अनेक महत्त्वाची कामे आहेत, ज्यासाठी कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे कम्प्युटर अभ्यासक्रम करणे आज प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक झाले आहे.

फक्त नोकरीच नाही तर दैनंदिन जीवनात अशी अनेक महत्त्वाची कामे आहेत, ज्यासाठी कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे कम्प्युटर अभ्यासक्रम करणे आज प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक झाले आहे. परंतु काही वेळा चांगल्या कम्प्युटर कोर्सची फी काही विद्यार्थ्यांसाठी जास्त असू शकते.

आजचा काळ पाहता चांगली नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला कम्प्युटरचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. याशिवाय ऑनलाइन फॉर्म भरणे किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी अर्ज करणे यासारखी अनेक सामान्य कामे करण्यासाठी कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला कम्प्युटरचे मूलभूत ज्ञान असावे, यासाठी शासनाकडूनही योजना राबवल्या जात आहेत. त्यावर लक्ष ठेवून तुम्ही त्या योजनांचा लाभ घेऊ शकता. 
सरकारने संगणक साक्षरता अभियान सुरू केले आहेत, ज्याअंतर्गत विद्यार्थ्यांना कम्प्युटरशी  संबंधित आवश्यक शिक्षण मोफत दिले जाते.

शासकीय कम्प्युटर कोर्समध्ये शासनमान्य कम्प्युटरचाही समावेश आहे. टायपिस्ट, स्टेनो, कॉम्प्युटर ऑपरेटर, लिपिक, डीईओ इत्यादी अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी सरकार मान्यताप्राप्त संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

तुमच्या शहरातील काही कम्प्युटर इन्स्टिट्यूड सोबत सरकार डिल करतं आणि विद्यार्थ्यांना कोर्स फी मध्ये काही सूट दिली जाते. त्याच बरोबर काही कम्प्युटर इन्स्टिट्यूड सुद्धा विद्यार्थ्यांना सूट देतात. 

काही मुख्य कम्प्युटर कोर्स 

CCC computer course

Diploma in information technology

DCA

Cyber security computer course 

Certificate in financial accounting

Tally account

DTP Operator

Web designing 

Diploma in computer hardware and network engineering

VFX and Animation

या कोर्ससाठी सध्या सरकारकडून काहीही योजना नाहीत. पण गावातील काही सामाजिक संस्था याबाबत पुढाकार घेतात. त्यावर तुमचे लक्ष असले पाहिजे. समाजाचा सर्वात महत्वाचा घटक आणि भविष्य म्हणजे विद्यार्थी त्यामुळे त्यांना काहीही कमी पडायला नको या उद्देशाने सरकार आणि सामाजिक संस्था पुढाकार घेतात. 

या सर्व योजनांची माहिती कुठे मिळते?  

तुमच्या गावाचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा फेसबुक ग्रुप आहे त्यात तुम्ही जॉइन होऊन याबाबत माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर कम्प्युटर इन्स्टिट्यूड सोबत संपर्कात रहा. 

प्रधानमंत्री कौशल विकास योजना

केंद्र सरकारने प्रधानमंत्री कौशल विकास योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. भारतात राहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देणे हे प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे उद्दिष्ट आहे. तसेच योजनेनुसार भारतातील सर्व सुशिक्षित तरुणांना सरकारकडून मोफत औद्योगिक प्रशिक्षण दिले जाईल. 15 जुलै 2015 रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य योजना सुरू करण्यात आली.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना अपडेट 

योजनेचे नाव प्रधानमंत्री कौशल विकास योजना असे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. विभाग कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत चालवली जाते. 15 जुलै 2015 ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षित करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन करू शकता. अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. या योजनेबाबत अधिक माहिती पुढील लेखात मिळेल.