साई सिल्क कलामंदिर (Sai Silk Kalamandir)ने आपला आयपीओ (IPO) आणण्यासाठी सेबी (SEBI)कडे अर्ज दाखल केला आहे. या आयपीओमध्ये 600 कोटी रूपयांचे फ्रेश इश्यू असणार आहेत. याबरोबरच 18,048,440 इक्विटी शेअर्स सेल ऑफर्ससाठी उपलब्ध असणार आहेत. या ऑफर अंतर्गत जारी होणाऱ्या शेअर्सची फेस व्हॅल्यू 2 रूपये प्रति इक्विटी शेअर असणार आहे.
आयपीओमधील एकूण इश्यूपैकी 50 टक्के भाग QIB गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे. तर यातील 15 टक्के हिस्सा हा नॉन इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव असणार आहे. तर 35 टक्के भाग हा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असणार आहे. साई सिल्क कंपनीच्या आयपीओचा प्राईस ब्रॅण्ड आणि ओपनिंग तारखेबाबतची माहिती सेबीकडून मंजूरी मिळाल्यावर दिली जाणार आहे.
आयपीओच्या ऑफर सेल अंतर्गत कंपनीचे शेअर होल्डर नागकनक दुर्गा प्रसाद (Nagakanaka Durga Prasad Chalavadi) यांच्याकडे 64,10,005 इक्विटी शेअर, झांसी राणी (Jhansi Rami Chalavadi) 79,49,520, धनलक्ष्मी पेरूमल (Dhanalakshmi Perumalla) 30,83,865, डुडेश्वर कनक दुर्गाराव (Doodeswara Kanaka Durgarao Chalavadi) 96,750, कल्याण श्रीनिवास अन्नम (Kalyan Srinivas Annam) 2,61,300, सुभाष चंद्र मोहन (Subash Chandra Mohan Annam) 1,38,000 आणि वेंकट राजेश अन्नम (Venkata Rajesh Annam) 1,09,000 इक्विटी शेअर्स विकणार आहेत.
कंपनीच्या फ्रेस इश्यूमधून मिळणाऱ्या 600 कोटी रूपयांमधून 122.58 कोटी रूपयांचा उपयोग 25 नवीन स्टोअर्स सुरू करण्यासाठी केला जाणार आहे. तर 25.39 कोटी रूपयांचा वापर 2 गोदाम बनवण्यासाठी केला जाणार आहे. 235.99 कोटी रूपयांचा उपयोग कंपनीच्या वर्किंग कॅपिटलची डिमांड पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. तर 60 कोटी रूपयांचा उपयोग कंपनीवर असलेलं कर्ज आणि इतर कामकाजांसाठी केला जाणार आहे.
मोतीलाल ओसवाल, एडलवाईस फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि एचडीएफसी या कंपन्या या आयपीओच्या बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.