Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Watch: तुमच्या ड्रेसनुसार घड्याळ बदलेल रंग; अॅपल स्मार्ट वॉचमध्ये आणणार हायटेक टेक्नॉलॉजी

Apple Watch band

Image Source : www.apple.com

अॅपल कंपनी आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनसाठी ओळखली आहे. ब्रँडेड गॅझेटमध्ये अॅपलच्या वस्तुंना मोठी मागणी आहे. अॅपल कंपनी असे स्मार्ट वॉच बँड घेऊन येत आहे, ज्याचा रंग तुमच्या अंगावरील कपड्यांप्रमाणे बदलेल. त्यामुळे मॅचिंग घड्याळ घालण्याचा प्रश्नच सुटणार आहे.

Apple Watch band: अॅपल कंपनी आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनसाठी ओळखली जाते. ब्रँडेड गॅझेटमध्ये अॅपलच्या वस्तुंना मोठी मागणी आहे. अॅपल कंपनी असे स्मार्ट वॉच बँड घेऊन येत आहे, ज्याचा रंग तुमच्या अंगावरील कपड्यांप्रमाणे बदलेल. त्यामुळे मॅचिंग घड्याळ घालण्याचा प्रश्नच सुटणार आहे. अनेकांना प्रत्येक गोष्ट मॅचिंग लागते, त्यावर अॅपलने हे भन्नाट सोल्यूशन आणले आहे. तुमच्या कपड्यांनुसार घड्याळाच्या बँडचा रंग बदलेल. सध्या अॅपल या टेक्नॉलॉजीवर काम करत असून येत्या काळात अशी स्मार्ट बँड बाजारात येतील.

मॅचिंग बँड घेण्याचा खर्च वाचणार

अॅपल इनसाइडर या खास अॅपल उत्पादनांची माहिती देणाऱ्या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. घड्याळ घालणाऱ्या व्यक्तीच्या कपड्यांनुसार वॉच बँड आपला रंग कसा बदलेल या तंत्रज्ञानावर अॅपल काम करत आहे. या तंत्रज्ञानाचे पेटंटही अॅपलने मिळवले आहे. कपड्यांनुसार घड्याळाचे विविध रंगाचे बँड विकत घेण्याचा खर्च हे तंत्रज्ञान आल्यानंतर ग्राहकांना करावा लागणार नाही. कारण घड्याळाचे स्मार्ट बँड आपोआप आपला रंग बदलेल. वापरकर्त्याला विविध स्टाईल करता याव्यात यासाठी खास ही टेक्नॉलॉजी कंपनी घेऊन येत आहे.

काय आहे स्मार्ट बँड मागे तंत्रज्ञान? (Technology behind apple watch band)

या नवीन तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रोक्रोमीक फिचर (electrochromic features in apple band) असणार आहे. applied voltage मुळे बँड म्हणजेच घडाळ्याच्या पट्ट्यामध्ये विविध रंग तयार होतील. हे रंग तुमच्या कपड्यांना मॅच होऊ शकतील. रंग बदलणाऱ्या बँडचा वापर कंपनी विविध उत्पादनांमध्ये करू शकते. मात्र, ही टेक्नॉलॉजी स्मार्ट वॉचच्या बँडला देण्यात येणार आहे. फिलामेंट पासून तयार केलेल्या कापडी पट्ट्यांमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या कापडातील फिलामेंटमध्ये इलेक्ट्रोक्रोमिअम फिचर देण्यात येणार आहे. त्यामुळे हे फिलामेंट विविध रंग तयार करतील, असे अॅपल इनसाइडरने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. 

चार इंजिनिअर्सच्या नावावर हे पेटंट आहे. यावर काम करणाऱ्या तंत्रज्ञांनी टच सेंसिटिव्ह फॅब्रिकचा वापर इतर कोणत्या वस्तुंमध्ये करता येईल का? (Apple Watch band changes color) यावरही काम केले आहे. अॅपल हे नवे फिचर मार्केटमध्ये कशा पद्धतीने लाँच करते, हे येत्या काळात कळेल. अॅपलच्या iPhone 15 ची ही ग्राहकांना प्रतिक्षा लागली आहे. अॅपलच्या गॅझेटमधील नवनवीन फिचर्स ग्राहकांच्या कायम पसंतीस पडतात. त्यासाठी जास्त पैसे खर्च करण्यासही ग्राहक तयार आहे.