Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Business : येत्या 5 वर्षात 5% व्यवसाय वृद्धी करण्याची ॲपलची योजना

Apple Business

भारतातील स्मार्ट फोन युजर्सच्या खरेदीचा कल बघता आयफोन 12, आयफोन 13 आणि आयफोन 14 या सिरीजच्या स्मार्ट फोन्सला मोठी मागणी आहे. आयफोन 15 लाँच केल्यानंतर कंपनीने इतर सिरीजच्या स्मार्ट फोनच्या किमती 10 हजारांनी कमी केल्या आहेत. कंपनीने फ्लिपकार्ट, अमेझॉन व इतर ई-कॉमर्स कंपन्यांशी विक्रीबाबत करार केला असून या कंपन्या ग्राहकांना अर्थसहाय्य देखील देऊ करत आहे.

अ‍ॅपलने भारतात त्यांचे रिटेल स्टोअर सुरु केल्यापासून भारतात व्यापारवाढीसाठी कंपनी मेहनत घेतल असल्याचे दिसते आहे. दिल्ली आणि मुंबईतील स्टोअर्समध्ये भारतीय ग्राहकांची मोठी गर्दी असून कंपनीचा महसूल देखील वाढला आहे. अ‍ॅपलने iPhone 15 लाँच केल्यानंतर स्टोअर्ससमोर अ‍ॅपलप्रेमींनी लावलेल्या रांगा बघून तुम्हांला कल्पना आलीच असेल.

भारतीयांचे अ‍ॅपल प्रेम बघून आणि भारतीय स्मार्ट फोनचे मार्केट लक्षात घेता कंपनीने पुढील 4-5 वर्षांत भारतात उत्पादन पाचपट वाढवण्याची योजना आखली आहे. सोबतच कंपनीचा महसूल 40 अब्ज डॉलर्सपर्यंत म्हणजेच सुमारे 3.32 लाख कोटी रुपयांपर्यंत महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे.

‘अ‍ॅपल’ची उत्पादने जोरात 

भारतातील स्मार्ट फोन युजर्सच्या खरेदीचा कल बघता आयफोन 12, आयफोन 13 आणि आयफोन 14 या सिरीजच्या स्मार्ट फोन्सला मोठी मागणी आहे. आयफोन 15 लाँच केल्यानंतर कंपनीने इतर सिरीजच्या स्मार्ट फोनच्या किमती 10 हजारांनी कमी केल्या आहेत. कंपनीने फ्लिपकार्ट, अमेझॉन व इतर ई-कॉमर्स कंपन्यांशी विक्रीबाबत करार केला असून या कंपन्या ग्राहकांना अर्थसहाय्य देखील देऊ करत आहे.  

7 अब्ज डॉलर्सचा आकडा पार 

गेल्या आर्थिक वर्षातील ताळेबंद बघता अ‍ॅपलने 7 अब्ज डॉलर्स आर्थिक उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक (Apple CEO Tim Cook) यांनी म्हटले होते की, भारतात Apple ने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. भारतीय ग्राहकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याकडे आमचे लक्ष असेल त्यांनी म्हटले होते.

Apple कंपनी भारतात सध्या आयफोन बनवते आहे आणि पुढील वर्षापासून एअरपॉड्सचे उत्पादन सुरू करण्याची योजना आखत आहे, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. असे असले तरी भारतात आयपॅड किंवा लॅपटॉप तयार करण्याची कोणतीही योजना नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.