Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Foxlink Fire: आंध्रप्रदेशात iPhone निर्मिती प्रकल्पाला आग; 100 कोटींचं नुकसान, इमारतही कोसळली

Foxlink Fire

Image Source : www.deccanherald.com

भारतामध्ये अॅपल कंपनीच्या मोबाईल आणि अॅक्सेसरीजचे उत्पादन होते. चीनकडे याची मक्तेदारी होती. मात्र, कोरोनानंतर अॅपल कंपनीचे मोबाईल, गॅझेट्स आणि अॅक्सेसरीज निर्मितीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी भारतात प्लांट सुरू केले आहेत. आंध्रप्रदेशातील Foxlink या अॅपलच्या सप्लायर कंपनीला आग लागल्याची घटना घडली.

Foxlink Fire: भारतामध्ये सर्वाधिक अॅपल कंपनीच्या मोबाईलचे उत्पादन होते. चीनकडे याची मक्तेदारी होती. मात्र, कोरोनानंतर अॅपल कंपनीचे मोबाईल, गॅझेट्स आणि अॅक्सेसरीज निर्मितीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी भारतात प्लांट सुरू केले  आहेत. आंध्रप्रदेशातील Foxlink या अॅपलच्या सप्लायर कंपनीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीचे 100 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आंध्रप्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात फॉक्सलिंक कंपनीचा प्रकल्प आहे.

iPhone च्या चार्जर निर्मिती प्रकल्पाला आग (Apple mobile charger plant fire)

फॉक्सलिंक प्रकल्पामध्ये आयफोन्सच्या चार्जरची निर्मिती केली जाते. मात्र, अॅसेंबली लाईनला सोमवारी आग लागली. या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. Foxlink ही अॅपलची सप्लायर कंपनी असून अॅक्सेसरीज निर्मितीचे काम करते. आग इतकी भीषण होती की, तेथील सामुग्रीचा कोसळाच झाला. आगीनंतर चार्जर निर्मितीचे काम थांबले आहे.

कंपनीची इमारत कोसळली (Foxlink building collapsed after fire)

आग लागल्यानंतर तिरुपती येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या प्लांटमधून 400 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आगीनंतर 50% मशिनरी जळून खाक झाल्या तर अर्धी इमारतही कोसळली, असे अग्निशमन दलाचे अधिकारी आर. रामानहिया यांनी सांगितले. हे नुकसान शंभर कोटींपेक्षा जास्त असावे, असा अंदाज फॉक्सलिंक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अॅपल कंपनीने आगीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

अॅपल कंपनीच्या उत्पादनावर काय परिणाम होणार? (Impact of Foxlink fire)

फॉक्सलिंक प्रकल्पामध्ये आयफोनच्या चार्जरची निर्मिती केली जाते. हा चार्जर निर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. (Apple charger plant fire) त्यामुळे काही काळ अॅपल कंपनीला होणारा चार्जरचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. मात्र, इतर प्रकल्पातून ही गरज भागवली जाऊ शकते. मात्र, त्यासही वेळ लागेल. रिटेल चार्जर विक्री करताना चार्जरची किंमतही काही काळ वाढू शकते.

अमेरिकेतील बलाढ्य कंपनी अॅपलने आयफोन निर्मितीसाठी भारताला प्राधान्य दिले आहे. मागील काही वर्षांपासून आयफोनची सर्वाधिक निर्मिती चीनमध्ये होते. मात्र, कोरोना आणि जागतिक मंदीमुळे चीनमधून अॅपल आपली गुंतवणूक काढून घेत आहे. 2027 पर्यंत प्रत्येकी दोनपैकी एका आयफोनची निर्मिती (iPhone Production in India) भारतात होईल, अशी माहिती समोर आली आहे. मागली वर्षी एप्रिल ते डिसेंबर या फक्त नऊ महिन्यांच्या काळात अॅपल कंपनीने भारतामध्ये सुमारे अडीच बिलियन डॉलर किंमतीचे आयफोन निर्यात केले होते.