वेदांता रिसोर्सेसनं (Vedanta Resources) अलीकडेच वायजे चेन (YJ Chen) यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. आता ही कंपनी भारतात 4 अब्ज डॉलरचा कारखाना उभारण्यासाठी जागतिक स्तरावर प्रतिभा शोधत आहे. वायजे चेन यांनी यापूर्वी चीनच्या एचकेसी समूहासोबत (HKC Group) काम केलं आहे. ते म्हणाले, की हा उपक्रम लवकरच दक्षिण कोरिया, तैवान आणि जपान या देशांसह अनेक ठिकाणांहून नोकरभरती करणार आहे. ही कंपनी भारतात लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (Liquid crystal display) पॅनल फॅब्रिकेशन युनिट स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या कारखान्याच्या माध्यमातून कंपनी थेट 3500 नोकरीच्या संधी निर्माण करणार असल्याचं वायजे चेन यांनी सांगितलं.
Table of contents [Show]
डिस्प्ले व्यवसाय चिप व्यवसायापेक्षा वेगळा
ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, की योग्य लोक शोधणं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. वायजे चेन यांना डिस्प्ले उद्योगात 23 वर्षांचा काम करण्याचा अनुभव आहे. भारताला तंत्रज्ञान उत्पादन केंद्र बनवण्याच्या वेदांताचा प्रयत्न आहे. या संधीचा फायदा घ्यायचा कंपनीला घ्यायचा आहे. प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबूनहीही कंपनी इलेक्ट्रॉनिक घटकांच्या बाजारपेठेत आपली पकड निर्माण करण्याचा विचार करत आहे. वेदांताचा हा नवीन डिस्प्ले व्यवसाय त्याच्या चिप व्यवसायापेक्षा वेगळा असणार आहे. चिप व्यवसायापेक्षा डिस्प्ले व्यवसायासाठी पुढे जाण्याचा मार्ग सोपा होण्याची शक्यता आहे.
चिप व्यवसायासाठी नव्यानं अर्ज
फॉक्सकॉनसह वेदांतानं पुन्हा एकदा नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारावर एमईआयटीवायला (MeitY) सुधारित अर्ज सादर केला आहे. हा नवा अर्ज 40 एनएन नोड कॅटेगरीच्या आधारे सादर करण्यात आला आहे. यापूर्वी तो 28 एनएन नोट कॅटेगरीसाठी जमा करण्यात आला होता. दरम्यान, वेदांताच्या चिप बिझनेस प्लॅनला अजून सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. मात्र या व्यवसायासाठी मार्ग सुकर झाला आहे. वेदांताजवळ अवनस्ट्रेटमध्ये (AvanStrate) हिस्सा आहे. ही कंपनी एलसीडी पॅनेल बनवते.
EXCLUSIVE: Billionaire Anil Agarwal’s metals and mining firm Vedanta seeks 3,500 global workers to build and run a $4 billion LCD factory in India https://t.co/3sDIym1xG9
— Bloomberg (@business) June 28, 2023
एलसीडी की ओएलईडी?
सध्या जगातल्या विविध मोठ्या कंपन्या एलसीडी तंत्रज्ञानाला मागे टाकून ओएलईडीकडे (Organic light emitting diode) वळत आहेत. डिस्प्ले तंत्रज्ञानातल्या विश्वा, दक्षिण कोरियाची सॅमसंग ही आताच्या घडीची सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीनं एलसीडीचं उत्पादन जवळपास बंद केलं असून नेक्स्ट जनरेशन डिस्प्ले जनरेशन तंत्रज्ञानावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. एलजी ही कंपनीदेखील असंच प्लॅनिंग करत आहे.
कंपनीची आव्हानं आणि धोरणं
वेदांताला पुढच्या 7 वर्षांमध्ये या व्यवसायात दरवर्षी सुमारे 30 अब्ज डॉलरवाढीची अपेक्षा आहे. मात्र चीनमधून आयात केलेल्या स्वस्त एलसीडी डिस्प्ले कंपन्यांशीही कंपनीला स्पर्धा मिळणार आहे. वायजे चेन म्हणतात, की भारतात त्यांची पुरवठा साखळी तयार करण्यावर त्यांचा भर आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनी नवीन डिझाइनवर भर देणार आहे.