Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Android 14 Launch: अॅंड्राइड 14 लवकरच लाँच होणार; नवं डिझाइन आणि अफलातून फिचर्स काय असतील पहा

Android 14 Launch

Image Source : www.nextpit.com

अँड्रॉइडच्या नावासंबंधित एक इंटरेस्टिंग माहिती नव्या अपडेटच्या निमित्ताने समोर आली आहे. अँड्राइडच्या प्रत्येक नव्या व्हर्जनला एका स्वीट डिशचे (गोड पदार्थ) नाव देण्यात येते. सर्वात पहिल्या अँड्राइड व्हर्जनचे नाव कपकेक (Cupcake) असे देण्यात आले होते. त्यानंतर डोनट, जेलीबीन, लॉलिपॉप, ओरियो अशी काही नावं पुढील Android व्हर्जनसाठी देण्यात आली होती. Android 14 साठीही एक सुंदर नाव देण्यात आले आहे.

Android 14 Launch: मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिममध्ये गुगलने तयार केलेली अँड्राइड ही OS मार्केट लिडर आहे. अॅपलने तयार केलेल्या iOS ऑपरेटिंग सिस्टिमपेक्षा कित्येक पटींनी जास्त ग्राहक अँड्राइड वापरणारे आहेत. त्यामुळे कंपनीकडून ग्राहकांना कायम नवनवीन फिचर्स दिली जातात. Linux प्रोग्रामिंग लँगवेजवर आधारित ही OS 2008 म्हणजेच आजपासून 14 वर्षांपूर्वी प्रथम लाँच झाली. तेव्हापासून कंपनीने अँड्राइडचे अनेक व्हर्जन लाँच केले आहेत. आता अँड्राइड 14 ची उत्सुकता ग्राहकांना लागली आहे.

सध्या अँड्राइड 14 चे काम शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र, त्याआधी गुगलकडून पिक्सल मोबाईलसाठी Android 13 चे अपडेटेड व्हर्जन लाँच केले जाणार आहे. त्यानंतर  Android 14 बाजारामध्ये येईल. सध्या कंपनीने Android 14 चा डेव्हलपर्स प्रिव्हयू लाँच केला आहे. याद्वारे ऑपरेटिंग सिस्टिम व्यवस्थित काम करते का हे टेस्ट केले जात आहे.

प्रत्येक अँड्राइड व्हर्जनला गोड पदार्थाचं नाव (Sweet dish name to every android version)

अँड्रॉइडच्या नावासंबंधित एक इंटरेस्टिंग माहिती नव्या अपडेटच्या निमित्ताने पुढे आली आहे. अँड्राइडच्या प्रत्येक नव्या व्हर्जनला एका स्वीट डिशचे नाव देण्यात येते. त्यास डेझर्ट नेम असंही म्हणतात. सर्वात पहिल्या अँड्राइड व्हर्जनचे नाव Android 1.5: कपकेक (Cupcake) असे देण्यात आले होते. त्यानंतर डोनट, जेलीबीन, लॉलिपॉप, ओरियो, पाय अशी काही नाव पुढच्या Android व्हर्जनसाठी देण्यात आली. या नावांना कोडनेम असंही कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून संबोधलं जातं. त्यातील लॉलिपॉप हे व्हर्जनचं नाव ग्राहकांच्या तोंडी चांगलच बसलं होतं. ही या ऑपरेटिंग सिस्टिमची कमाल आहे.

Android 14 चं कोड नेम काय? (Android 14 Codename)

अँड्रॉइड 14 अजून लाँच झालं नसलं तरी त्याचं कोडनेम समोर आलं आहे. Upside Down Cake असं नाव या नवीन अपडेटचं नाव ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच केकवरची चेरी आणि क्रिमची टॉपिंग्ज असते ती खाली तर केक वरच्या बाजूने असा त्याचा अर्थ आहे. असं नाव ठेवण्यामागे काय लॉजिक आहे, हे मात्र, समजू शकलं नाही. मात्र, लाँचवेळी कंपनी याचा अर्थ ग्राहकांना सांगू शकते.


 
Android 14 मध्ये काय फिचर्स असतील? (Android 14 features)

नव्या अँड्रॉइड 14 मध्ये कंपनीने ग्राहकांच्या गरजा ओळखून स्थानिक भाषेनुसार फिचर्स देण्यावर भर दिला आहे. स्थानिक भाषेतील कॅलेंडर, तापमानाची माहिती, आठवड्याचा पहिला दिवस कोणता सेट करायचा, तसेच स्थानिक भाषेतील नंबर्सचाही वापर ग्राहकांना करता येईल. ग्राहकांना जास्तीत जास्त वैयक्तिकृत म्हणजेच कस्टमाइज एक्सपिरियंस देण्यासाठी ही फिचर्स गुगलकडून देण्यात आली आहेत.

टचपॅड नेव्हिगेशनमध्ये अपडेट (Android 14 touchpad features)

1)मागे (बॅक) जाण्यासाठी तीन बोटांनी स्क्रिनच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला स्वाइप करू शकता
2)होम स्क्रिनवर जाण्यासाठी तीन बोटांनी वरच्या बाजूला स्वाइप करा. 
3)नुकतेच ओपन केलेल्या अॅप्सवर जाण्यासाठी तीन बोटांनी वरच्या बाजूला स्वाइप करा आणि दाबून धरू शकता. 
4)नोटिफिकेशन्स ओपन करण्यासाठी तीन बोटांनी खाली स्वाइप करू शकता. 
5)एका अॅपमधून दुसऱ्या अॅपमध्ये जाण्यासाठी चार बोटांनी डावीकडे स्वाइप करू शकता.

सोबतच अपडेटेड किपॅड, सेफ्टी फिचर्स, अॅप्स क्लोनिंग, सॅटलाइट कम्युनिकेश अशी ग्राहकांसाठी उपयुक्त फिचर्स अॅड करण्यात येणार आहेत. तसेच काही अनावश्यक फिचर्स काढून टाकण्यात येणार आहेत.