Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Malaria and GDP: काय म्हणता? मलेरियामुळे जीडीपीत सरासरी 1% घसरण! WHO चा अहवाल

Malaria and GDP

World Malaria Day: 2030 पर्यंत भारताला मलेरियामुक्त बनविण्याचा संकल्प भारत सरकारने केला आहे. गेल्या 5 वर्षात जवळपास मलेरियाच्या प्रकरणांमध्ये 60% पेक्षा जास्त घट झाल्याचे WHO ने म्हटले आहे.मलेरियामुळे जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था बाधित झाली आहे असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केला आहे.

मलेरिया हा एक प्राणघातक रोग आहे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु या रोगामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो का? याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी विचार केला नसेल. परंतु डब्ल्यूएचओच्या म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात याबद्दल सविस्तर निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. चला तर जाणून घेऊयात नेमके मलेरिया या आजारामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात.

अहवालात असे सूचित केले आहे की 2021 या वर्षात जगातील जवळपास निम्म्या लोकसंख्येला मलेरियाचा धोका होता. मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित देशांना आर्थिक अडथळ्यांचाही सामना करावा लागला, ज्यामुळे अनेक देशांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला आहे. कोरोना संक्रमणाच्या गर्तेतून सुटका होते ना होते तोच जगभरातील अनेक देशांना मलेरियाचा सामना करावा लागला होता. यामुळे सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला असे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नोंदवले गेले आहे.

आरोग्यावरील 40% खर्च मलेरियावर होतो

ब्राझील, स्पेन, अमेरिका आणि इतर देशांतील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, ज्या देशांमध्ये हा आजार सामान्य बनला आहे. वाढत्या डासांमुळे या देशातील नागरिक हैराण आहेत. येत्या काळात यावर ठीकपणे उपापयोजना न झाल्यास आणि मेलेरीयाचा प्रादुर्भाव आटोक्यात न आणल्यास ब्राझील, स्पेन, अमेरिकेसारख्या देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) 1.3 टक्क्यांनी घट होऊ शकते असे अहवालात म्हटले आहे. तसेच मलेरियामुळे जीडीपीच्या सरसरी एक टक्का घट होत असल्याचे देखील WHO ने म्हटले आहे. या देशांतील सार्वजनिक आरोग्यावरील खर्चात एकट्या मलेरियाचा वाटा 40 टक्के आहे.

2015 पासून, मालदीव, श्रीलंका, किरगिझस्तान, पॅराग्वे, उझबेकिस्तान, अर्जेंटिना, अल्जेरिया, चीन आणि एल साल्वाडोर हे मलेरियामुक्त देश आहेत, असे WHO ने जाहीर केले आहे.

भारतातील मलेरियाची परिस्थिती काय?

भारतात मलेरियाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. सरकारी स्तरावयासाठी वेगवगेळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. 2015 सालापासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य मंत्रालयाने मलेरियाचा सामना करण्यासाठी आणि या आजाराचे निर्मुलन करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरु केली आहे. 2030 पर्यंत भारताला मलेरियामुक्त बनविण्याचा संकल्प भारत सरकारने केला आहे. गेल्या 5 वर्षात जवळपास मलेरियाच्या  प्रकरणांमध्ये 60% पेक्षा जास्त घट झाल्याचे WHO ने म्हटले आहे.असे अस्ले तरी भारताला अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. मलेरिया आजारात अर्भकं, पाच वर्षांखालील बालके, गर्भवती महिला आणि एचआयव्ही असलेल्या लोकांना गंभीर संसर्गाचा धोका जास्त असतो.

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवायची असेल तर आपल्याला मलेरियाविरुद्ध देखील लढावे लागणार आहे.