तुम्हाला देखील स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे का? मात्र कोणता व्यवसाय करायचा ते सुचत नसेल,तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एका अशा व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याची मागणी 12 महिने 24 तास सतत असते. तो व्यवसाय आहे दुग्धजन्य पदार्थांची विक्री. दूध, दही, आईस्क्रीम इ. दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय सुरू करून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. सध्या देशातील सर्वात मोठी डेअरी उत्पादक कंपनी अमूलने त्यांची फ्रेंचायजी द्यायला सुरुवात केली आहे. या फ्रेंचायजी व्यवसायबाबतच्या काही गोष्टी आज जाणून घेऊयात.
फ्रेंचायजीचे प्रकार आणि गुंतवणुकीबद्दल जाणून घ्या
अमूल कंपनी दोन प्रकारच्या फ्रेंचायजी ऑफर करत आहे. ज्यामध्ये पहिली अमूल रेल्वे पार्लर (Amul Railway Parlor) किंवा अमूल क्योस्क फ्रेंचायजी (Amul Kiosk Franchise) आहे. तर दुसरी फ्रेंचायजी ही अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर (Amul Ice Cream Scooping Parlor Franchise) आहे.
तुम्हाला पहिल्या प्रकारातील फ्रेंचायजीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर किमान 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. तर दुसऱ्या प्रकारातील फ्रेंचायजी मॉड्युलसाठी 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल. तसेच साधारण 25 ते 50 हजार रुपये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी रक्कम (non-refundable brand security amount) म्हणून द्यावी लागणार आहे.
अमूल फ्रेंचायजी मॉड्युल घेण्यासाठी कंपनीने निश्चित केलेल्या अटींची पूर्तता करावी लागेल. उदा. मेन रोडवर किंवा बाजारपेठेत तुमचे दुकान असणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणती फ्रेंचायजी घ्यायची आहे, त्यानुसार तुमच्या दुकानाचा आकार ठरेल.
किती खर्च येईल?
तुम्हाला अमूल आउटलेट उघडायचे असेल, तर तुम्हाला नॉन-रिफंडेबल सिक्युरिटी म्हणून 25,000 रुपये कंपनीला द्यावे लागतील. याशिवाय तुमच्याकडून दुकानाच्या नूतनीकरणासाठी 1 लाख रुपये आणि उपकरणासाठी 75 हजार रुपये घेतले जातील. एकूण, पहिल्या प्रकारतील अमूल आउटलेट उघडण्यासाठी किमान 2 लाख रुपये खर्च करावे लागतील.
दुसऱ्या प्रकारतील फ्रेंचायजी मॉड्यूल अमूल आईस्क्रीम पार्लरसाठी जास्त खर्च येणार आहे. यासाठी तुमच्याकडून 50,000 रुपये नॉन-रिफंडेबल सिक्युरिटी स्वरुपात घेतले जातील. तसेच 4 लाख रुपये दुकानाच्या नूतनीकरणासाठी आणि 1.50 लाख रुपये उपकरणासाठी घेतले जातील.
कमिशन किती मिळेल?
अमूल फ्रेंचायजी व्यवसायातून कमिशन बेसवर कमाई करता येते. यातील उत्पादनांच्या विक्रीवरील कमिशनमधून तुम्हाला तुमचे उत्पन्न मिळणार आहे. यामध्ये दुधाच्या पिशवीवर 2.5 टक्के कमिशन मिळेल. दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के तर अमूल आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळणार आहे.
जर तुम्ही अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायजी घेतली, तर तुम्हाला रेसिपीवर आधारित आईस्क्रीम, शेक आणि हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्क्यांचे कमिशन मिळणार आहे. तसेच कंपनीच्या प्री पॅक आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळणार आहे. तर उर्वरित अमूल उत्पादनांवर 10 टक्के कमिशन मिळणार आहे. ज्यातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.
Source: hindi.news18.com