Amazon Republic Day Sale 2023: ई-कॉमर्सच्या मायाजालातील भारतातील सर्वांत मोठी कंपनी अॅमेझॉनने भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ग्रेट रिपब्लिक डे सेलची घोषणा केली. अॅमेझॉनचा हा सेल 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि 22 जानेवारी, 2023 पर्यंत चालणार आहे. तर अॅमेझॉनने आपल्या प्राईम मेंबर्ससाठी हा सेल 18 जानेवारीपासून ओपन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्राईम मेंबर्सना इतरांपेक्षा 1 दिवस अगोदर ऑफर्स आणि डिस्काऊंटचा लाभ घेता येणार आहे. तसेच सेलमध्ये ग्राहकांना ओप्पो, शिओमी, वनप्लस, सॅमसंग, अॅप्पल, विवो आणि इतरही ब्रॅण्ड्सवर सूट मिळणार आहे.
अॅमेझॉनच्या सेलमध्ये एवढेच नाही तर ई-टेलर इलेक्ट्रॉनिक्स, अॅक्सेसरीज, गॅजेट्स, फॅशनेबल कपडे आणि घरगुती वस्तुंवर सूट तर दिली जाणार आहेच, पण त्याचबरोबर काही कॅशबॅक ऑफर ही दिली जाणार आहे. सर्वांत मजेशीर गोष्ट म्हणजे, अॅमेझॉनच्या या प्लॅटफॉर्मवरून इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटच्या खरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. याशिवाय एसबीआय क्रेडिट कार्डचा (SBI Credit Card) वापर करणाऱ्या आणि एसबीआय डेबिट कार्डचा (SBI Debit Card) वापर करणाऱ्या ग्राहकांनी ईएमआय सुविधेचा वापर केल्यास त्यांना त्यावार 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट दिला जाणार आहे.
सन विल बॅटरी हीटेड बीनी हॅट
सन विल बॅटरी हीटेड बीनी हॅट ही इलेक्ट्रिसीटीने रिचार्ज करता येणारी हॅट आहे. हिवाळ्यामध्ये यातून हवीहवीशी वाटणाऱ्या गरमीचा आनंद घेता येतो. याटी किंमत 15,198 रुपये असून फेडरल बँकेच्या कार्ड्वर याची खरेदी केल्यास ग्राहकाला 300 रुपयापर्यंत सवलत मिळू शकते. याची बॅटरी चार तासात पूर्ण चार्ज होते आणि ती 8 तासांपर्यंत चालते.
क्रॉम्प्टन सोलारियम क्यूब आयओटी गीझर
अॅलेक्साच्या फीचर्ससह उपलब्ध असलेला क्रॉम्प्टन सोलारियम क्यूब IoT 15L स्मार्ट स्टोरेज वॉटर हीटर (गिझर) अॅमेझॉनवर 17 हजारांऐवजी 12,499 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच येस बँकेच्या क्रेडिट कार्ड ईएमआयवरून ग्राहकांनी याची खरेदी केल्यास ग्राहकाला 1500 रुपयांपर्यंतची सूटदेखील मिळणार आहे. या गिझरमध्ये वाय-फायची सुविधा देण्यात आली आहे. तसेच याचे तापमान डिजिटली पाहता येते.
या स्मार्टफोन्सवर मिळणार भरघोस सवलत
अॅमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये ग्राहकांना Oppo, Xiaomi, OnePlus, Samsung, Apple आणि Vivo यासारख्या ब्रॅण्डेड कंपन्यांच्या स्मार्टफोनवर सूट मिळणार आहे. स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.