Amazon Sale : Amazon वर पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज सेल सुरू सुरू झाला आहे. हा सेल 19 मे ते 24 मे 2023 पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये सॅमसंग आणि रेडमी स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट देण्यात आली आहे. तुम्हाला जर स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आता तुम्ही Amazon या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून करू शकता. एका स्मार्टफोनवर 5000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर माहीत करून घ्या, याबाबत सविस्तर माहिती.
Table of contents [Show]
Samsung Galaxy M04
Samsung Galaxy M04 हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये येतो. Samsung Galaxy M04 1 मध्ये 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि दुसऱ्यामध्ये 4GB RAM + 128GB स्टोरेज. 64GB वेरिएंटची मूळ किंमत 11,999 रुपये आहे पण Amazon सेलमध्ये त्याची किंमत 7,749 रुपये आहे. दुसऱ्या 128GB वेरिएंटची मूळ किंमत 13,499 रुपये आहे पण सेलमध्ये त्याची किंमत 8,749 रुपये आहे. फोन Mediatek Helio P35 सह येतो. 15W चार्जिंग सपोर्टसह, यात 15MP फ्रंट लेन्स आणि 2MP सेकंड लेन्ससह ड्युअल लेन्स रिअर कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा हा 5MP चा सेन्सर आहे.
Redmi 12c
Redmi 12Cची लिस्टिंग किंमत 13,999 रुपये आहे परंतु Amazon सेलमध्ये ती 8,799 रुपयांना विकली जात आहे. फोन Mediatek Helio G85 SoC प्रोसेसरसह येतो. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, ते IPS LCD, 500 nits सह 720 x 1650 पिक्सेलसह आहे. फोन 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. दोन रियर कॅमेरे आहेत - 50MP आणि 0.08 MP कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 5MP सेल्फी स्नॅपर आहे.
Samsung Galaxy M13
Samsung Galaxy M13ची मूळ किंमत 14,999 रुपये आहे परंतु Amazon वर सेलमध्ये हा फोन 9,699 रुपयांना ऑफर केला जात आहे. फोनमध्ये Exynos 850 चिपसेट आहे आणि 15W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करतो. फोनमध्ये 50MP, 5MP (अल्ट्रावाइड) आणि 2MP सह ट्रिपल-लेन्स रिअर कॅमेरा सेटअप आहे.
Redmi A1
Redmi A1 फोनची मूळ किंमत 8,999 आहे पण Amazon सेलमध्ये तो 5,699मध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये Mediatek Helio A22 चिपसेट आहे. फोन 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरीसह येतो. हा फोन ड्युअल लेन्ससह येतो. एक 8 MP फ्रंट लेन्स आहे आणि 0.08 MPचा डेप्थ सेन्सर आहे. फ्रंट कॅमेरा 5MP आहे.