Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अ‍ॅमेझॉन व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणूक करणार?

vodafone idea amazon

व्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone Idea) शेअर्समध्ये वाढ होत असल्याने या कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉन (Amazon) गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांपासून व्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone-Idea)  शेअर्समध्ये वाढ होत आहे. व्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone-Idea)  निधी उभारणी योजनेमुळे मार्केट कॅप 2 हजार  कोटींनी वाढले आहे. या बातम्यांमुळे अ‍ॅमेझॉन (Amazon) सारखी मोठी कंपनी व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. जवळपास तीन वर्षांपासून, Vodafone-Idea आपल्या अ‍ॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू  (Adjusted Gross Revenue AGR ) समस्यांवर मात करण्यासाठी तसेच नेटवर्क आणि स्पेक्ट्रम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 25 हजार  कोटी उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) इक्विटी स्टेक विक्रीद्वारे 10 हजार कोटी रुपये आणि कर्जाद्वारे 10 हजार कोटी उभारण्याच्या विचारात आहे. असे केल्याने  त्याचे एकूण कर्ज 2 लाख कोटींहून अधिक होणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर ठक्कर म्हणतात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीला 25,000 कोटींची आवश्यकता आहे त्यापैकी कंपनीने एप्रिलमध्ये 4,500 कोटी उभारले आहेत.

व्होडाफोन-आयडिया सबस्क्रायबर्सच्या संख्येत घट

व्होडाफोन-आयडियाच्या सबस्क्राईबर्सची संख्या सातत्याने घटत आहे. 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत त्याचे 4.7 दशलक्ष सबस्क्रायबर्स कमी झाले. 2021-22 या आर्थिक वर्षात, टेल्कोने जवळपास 23 दशलक्ष सबस्क्राईबर्स गमावले. तर दर महिन्याला सरासरी 1.9 दशलक्ष सबस्क्राईबर्स कमी होत आहे. त्याचवेळी व्होडाफोन -आयडिया यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या एअरटेल (Airtel) ने मात्र 8 दशलक्ष सबस्क्रायबर्स जोडले. टेलकोने याचदरम्यान बंद (निष्क्रिय) असणाऱ्या आणि पैसे न भरणाऱ्या ग्राहकांची सेवा बंद केल्याने जिओला (Jio)ही 19 दशलक्ष सबस्क्रायबर्स गमवावे लागले.

द केनच्या वृत्तानुसार, अ‍ॅमेझॉन (Amazon) व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) मध्ये मोठी गुंतवणूक करू शकते, कारण अ‍ॅमेझॉन (Amazon) ही क्लाऊड सर्व्हिसेसमधील एकमेव मोठी  कंपनी आहे. जिची कोणत्याही दूरसंचार कंपनीत भागीदारी नाही. तर व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) ही एकमेव टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे. जिच्यामध्ये कोणत्याही अमेरिकी टेक्नॉलॉजी कंपनीने गुंतवणूक केली नाही. तर अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) प्रतिस्पर्धी असलेल्या फेसबुक (Facebook),  गुगल (Google) आणि मायक्रोसॉफ्टने (Microsoft) भारतातील रिलायन्स जिओ इन्फोकॉम (Reliance-Jio Infocam) आणि भारती एअरटेल (Bharti Airtel)मध्ये गुंतवणूक केली आहे. यापूर्वीही 2020 मध्ये अ‍ॅमेझॉन (Amazon) त्यांच्या यूएस वाहक व्हेरिझॉन (Verizon)साठी  व्होडाफोन-आयडियामध्ये 4 अब्ज डॉलर्सची संयुक्त गुंतवणूक करणार होते. पण ते शक्य झालं नाही.

व्होडाफोन-आयडियाला तातडीच्या मदतीची गरज आहे. जर अ‍ॅमेझॉनने गुंतवणूक केल्यास व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या कंपन्यांना मोठा आधार मिळणार आहे.