Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Smart Home Days Sale: या प्रोडक्टवर मिळतोय 75 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स

Amazon Smart Home Days sale

Image Source : www.amazon.com

Amazon Smart Home Days Sale: अ‍ॅमेझॉनने नुकताच त्यांचा स्मार्ट होम डेज सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये तुम्हाला टाॅपच्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंटवर घेता येणार आहेत. तसेच, तुम्ही या सेलद्वारे स्मार्ट होम प्रोडक्टही घेऊ शकणार आहात. त्यामुळे भरघोस मिळणारा डिस्काउंट चुकवू नका.

अ‍ॅमेझॉनच्या स्मार्ट होम डेज सेलमध्ये तुम्ही इको स्मार्ट स्पीकर्स आणि अ‍ॅलेक्सा-कनेक्ट स्मार्ट होम प्रॉडक्ट घेऊ शकणार आहात. हा सेल 7 सप्टेंबरला सुरू झाला असून 13 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, या सेलमध्ये अ‍ॅलेक्सा स्मार्ट होम कॉम्बो आणि इको स्मार्ट स्पीकर्स, स्मार्ट बल्ब, स्मार्ट कॅमेरे आणि स्मार्ट प्लग आकर्षक डिस्काउंटवर मिळणार आहे. यामध्ये विप्रो, फिलिप्स, कुबो, होममेट, टीपी-लिंक, एमआय, रियलमी, हॅवेल्स यांसारख्या ब्रँण्ड्सचे प्रोडक्ट्स तुम्हाला घेता येणार आहेत.

अ‍ॅलेक्सा स्मार्ट होम कॉम्बोजवर तगडा डिस्काउंट

अ‍ॅमेझॉनने काही ऑफर लिस्ट केल्या आहेत ज्या संपूर्ण विक्रीदरम्यान आणि स्टॉक असेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. मुख्य ऑफर स्मार्ट होम कॉम्बोजवर चालू आहेत, जसे की एक इको डिव्हाईस आणि एक स्मार्ट बल्ब.  याविषयीची माहिती कंपनीने निवेदनात दिली आहे. या सेलमध्ये प्रोडक्ट 2,099 रुपयांपासून सुरू आहेत. तसेच, यात 65 टक्के डिस्काउंटचा समावेश आहे. हे प्रोडक्ट अखेर 10,349 रुपयांपर्यंत तुम्ही घेऊ शकणार आहात.

  • इको डॉट (3rd Gen) + विप्रो स्मार्ट बल्ब फक्त 2,099 रुपये
  • इको डॉट (4th Gen) + विप्रो स्मार्ट बल्ब फक्त 2,899 रुपये
  • इको डॉट वाॅचसह (4th Gen) + विप्रो स्मार्ट बल्ब फक्त 2,899 रुपये
  • इको डॉट (5th Gen) + विप्रो स्मार्ट बल्ब फक्त 5,799 रुपये
  • इको (4th Gen) + विप्रो स्मार्ट बल्ब स्मार्ट फक्त 10,349 रुपये

इतका मिळतोय डिस्काउंट

तसेच, अ‍ॅमेझॉन इंडिया विप्रो, फिलिप्स, कुबो, हॅलोनिक्स, हॅवेल्स आदी ब्रॅण्ड्सवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देत आहे. लाइटनिंग ब्रँड डिस्काउंटव्यतिरिक्त ही ऑफर स्मार्ट कॅमेरा ब्रॅण्ड्सवर असून कुबो, टीपी-लिंक, फिलिप्स, शाओमी, झेब्रोनिक्स इत्यादींवर  40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय स्मार्ट प्लग, टच स्विच आणि स्मार्ट लाइटिंगवर 75 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

खरेदी कशी करायची?

  • फक्त amazon.in/alexasmarthomedays ला भेट द्या.
  • आवडीचे प्रोडक्ट पाहा आणि कार्टमध्ये टाका.
  • तुमच्या पेमेंटची पद्धत निवडा आणि चेक आउटसाठी पुढे जा.