रक्षा बंधन निमित्त अॅमेझॉनने इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सवर सवलत जाहीर केली आहे. आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इअरबड्स, स्मार्टफोन्सवर सवलत देण्यात आली आहे. याशिवाय डेबिट आणि क्रेडीट कार्डने खरेदी केल्यास त्यावर सवलत देण्यात येणार आहे.
या सवलत योजनेत रिअलमी बड्सएअर सवलतीत 4499 रुपयांना मिळणार आहे. गोवो गो बड्स 577 वायरलेस इअरबड्सची किंमत 1199 रुपये आहे. ट्रुक बड्स क्लॅरिटीची सवलतीत किंमत 1499 रुपये इतकी आहे. बिटएस्कपी ट्युन एक्सपॉड्स ब्लुटूथ ट्रु वायरलेस इअरबड्स रक्षा बंधननिमित्त 899 रुपयांना सवलतीत उपलब्ध आहेत.
या डिस्काउंट ऑफर्समध्ये वेगवेगळ्या ब्रॅंड्सच्या स्मार्ट वॉचेसवर देखील सवलत दिली जाणार आहे. यात अॅपल वॉच सिरिज 8 44 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. सॅमसंग गॅलक्सि वॉच 6 क्लासिक ब्लुटूथ या स्मार्टवॉचची किंमत 43 हजार 990 रुपये इतकी आहे. बोट स्मार्ट रिंग जेन-1 या स्मार्टवॉचची सवलतीत किंमत 8999 रुपये इतकी आहे. बोट लुनार ओआरबी या स्मार्टवॉचची किंमत 2 हजार 199 रुपये इतकी आहे. नॉइज कलरफिट स्पार्क या स्मार्टवॉचची किंमत 1 हजार 999 रुपये इतकी आहे.
ब्लुटूथ स्पीकर्स आणि साउंडबार्सवर सवलत देण्यात आली आहे. इको डॉट हा अॅलेक्सासोबतचा स्मार्ट स्पीकर 2 हजार 749 रुपयांना खरेदी करता येईल. बोट स्टोन 580 ब्लुटूथ स्पीकरचा दर 1 हजार 999 रुपये इतका आहे. जेबीएल फ्लिप 6 वायरलेस पोर्टेबल ब्लुटूथ स्पीकरचा दर 11 हजार 999 रुपये आहे. याशिवाय रक्षा बंधन सेलमध्ये कॅमेरा , फॅशन डिव्हाइस यावर देखील सवलत देण्यात आली आहे.
स्मार्टफोनवर मिळणार डिस्काउंट
अॅमेझॉनवर रक्षा बंधननिमित्त स्मार्टफोनवर सवलत देण्यात आली आहे. यात नोकिया 2660 फ्लिप 4G वोल्टी किपॅड असलेला फोन ग्राहकांना केवळ 4 हजार 499 रुपयांना खरेदी करता येईल. जिओ भारत के1 फोन 999 रुपयांना उपलब्ध आहे. टेक्नो पोवा 5 प्रो 5G हा फोन 14 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. वन प्लस 11 5G फोनची किंमत 56 हजार 999 रुपये आहे. वन प्लस नॉर्ड सीई 2 लाईट या 5G फोनची किंमत 17 हजार 999 रुपये आहे. याशिवाय रिअलमी नार्झो, iQOO, रेडमी 12 सी अशा स्मार्टफोनवर सवलत देण्यात आली आहे.