तुम्हाला देखील स्मार्टफोन, टीव्ही किंवा किचन अप्लायंसेजची ऑनलाईन खरेदी करायची असेल, तर ॲमेझॉन कंपनीचा 'प्राईम डे सेल 2023' (Prime Day Sale 2023) सुरू झाला आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्ही बंपर डिस्काउंट मिळवू शकता. हा सेल आजपासून म्हणजेच 15 जुलैपासून सुरू झाला असून 16 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या ऑफर्स मिळणार आहेत. प्रॉडक्ट्स डिस्काउंटसोबत तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सेलमध्ये कोणत्या वस्तूंवर किती डिस्काउंट देण्यात येतोय, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
स्मार्टफोनवर मिळतोय 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट
ॲमेझॉन प्राईम डे सेल 2023 मध्ये तुम्ही कमी बजेटपासून ते महागडे फोन देखील खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यासोबतच तुम्हाला अनेक ऑफर्सचा देखील लाभ घेता येणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला 35,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर (exchange offer) देण्यात येत आहे. हे सर्व फोन तुम्ही नो कॉस्ट ईएमआयवर (No Cost EMI) खरेदी करू शकता. यासोबतच फोनच्या इतर ॲक्सेसरीजवर देखील डिस्काउंट देण्यात येत आहे.
टीव्हीच्या खरेदीवर मिळेल 77 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट
तुम्हाला देखील प्रीमियम फीचर्स आणि मॉडर्न टीव्ही खरेदी करायचा असेल, तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्हाला टीव्हीच्या खरेदीवर 77 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात येत आहे. Redmi, Samsung, Acer, Mi आणि TCL कंपन्या या सेलमध्ये सर्वोत्तम ऑफर्स देत आहेत. या सेलमध्ये तुम्ही 2,39,990 रुपयांचा टीव्ही 54,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
किचन अप्लायंसेजवर मिळतोय मोठा डिस्काउंट
तुम्हाला तुमचे किचन अधिक मॉडर्न बनवायचे असेल, तर तुम्ही ॲमेझॉन प्राईम डे सेल 2023 मधून कमी किंमतीत खरेदी करू शकता. या सेलमधून तुम्ही मिक्सर ग्राइंडर, वॉटर प्युरीफायरपासून अनेक आधुनिक किचन गॅजेट्स तुम्हाला याठिकाणाहून खरेदी करणार आहेत. या उत्पादनांवर देखील 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.
बँक ऑफर्सबाबत जाणून घ्या
तुम्ही ॲमेझॉन प्राईम डे सेल 2023 मधून उत्पादनांची खरेदी केल्यावर आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) किंवा एसबीआय बँकेच्या (SBI Bank) क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर तुम्हाला 10 टक्क्यांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय उत्पादनांवर एक्सचेंज ऑफर आणि ईएमआयने (EMI) खरेदी करण्याची सोय देखील देण्यात येत आहे.
Source: navbharattimes.indiatimes.com