डिजिटल पेमेंटमधील आघाडीची कंपनी 'अॅमेझॉन पे'वर आज रिझर्व्ह बँकेने दंडात्मक कारवाई केली आहे. केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने 'अॅमेझॉन पे'ला 3.06 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. (RBI Imposed Penalty on Amazon Pay)
रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या केवायसीसंदर्भात जारी केलेल्या नियमांचे अॅमेझॉन पे इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने उल्लंघन केल्याचे निदर्शनात आले आहे.ई-कॉमर्समधील आघाडी कंपनी अॅमेझॉनची उपकंपनी असलेल्या अॅमेझॉन पेवरील कारवाईने डिजिटल पेमेंट क्षेत्र धास्तावले आहे.आरबीआय पेमेंट अॅंड सिस्टम सेटलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 च्या कलम 30 नुसार रिझर्व्ह बँकने ही कारवाई केली आहे.
प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट आणि केवायसी नियमांची पूर्तता न केल्याने आरबीआयने कंपनीवर कारवाई केली. नियमांमध्ये पूर्तता न केल्याने ग्राहक आणि अॅमेझॉन पे यांच्यातील आर्थिक व्यवहारासंदर्भातील कराराची पूर्तता होत नाही, असे बँकेने म्हटले आहे. त्यावरुन रिझर्व्ह बँकेने 'अॅमेझॉन पे'ला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर कंपनीने दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने बँकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. बँकेने अॅमेझॉन पेला 30666000 कोटींचा दंड ठोठावला आहे.
डिजिटल पेमेंट क्षेत्रात तीव्र स्पर्धा
आधी नोटबंदी आणि त्यानंतर दोन वर्ष कोरोनो टाळेबंदी यामुळे देशात डिजिटल पेमेंटच्या व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. डिजिटल पेमेंट सेवा देणाऱ्यांमध्ये फोन पे, पेटीएम आणि अॅमेझॉन पे, गुगल पे, व्हॉट्सअप पे या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. यातील बड्या कंपन्या सध्यो तोट्यात आहे.
अॅमेझॉन पे 2000 कोटींचा महसुली टप्पा ओलांडला
अॅमेझॉन पेचा विचार केला तर सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने 2000 कोटींचा महसुली टप्पा ओलांडला होता. कंपनीच्या महसुलात 16% वाढ झाली. मात्र कंपनीला दुसऱ्या बाजूला 1741 कोटींचा तोटा झाला आहे. अॅमेझॉनचा तोटा 15% ने वाढला आहे. वर्ष 2022 मध्ये कंपनीचा एकूण खर्च 3793 कोटींपर्यंत वाढला होता. एका अहवालानुसार अॅमेझॉन पेचे भारतात 5 कोटी हून अधिक ग्राहक आहेत. यातून दररोज लाखो डिजिटल ट्रान्झॅक्शन होतात.