राज्य शासनाकडून नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपचारासाठी होण्याऱ्या खर्चातून ह असताना महात्माफुले जन आरोग्य योजनेच्या (MJPJAY) विमा संरक्षणाची मर्यादा 5 लाख करण्यात आली होती. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाकडून आणखी एक दिलासा दायक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात नागरिकांना आता पूर्णपणे नि:शुल्क उपचार मिळणार आहेत. या संदर्भात गुरुवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घोषणा केली. एएनआय या वृत्त संस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
खासगी रुग्णालयामध्ये भरती झाल्यास उपचारावर होणारा खर्च हा भरमसाठ आहे. काहीवेळा नागरिकांना आयुष्यभराची कमाई उपचारासाठी खर्च करावी लागते. रुग्णांना कराव्या लागणाऱ्या अशा प्रकारच्या संभाव्य आणि असंभाव्य खर्चातून दिलासा मिळावा यासाठी राज्यशासनाकडून 15 दिवसांपूर्वीच महात्मा फुले जन आरोग्य विमा संरक्षण योजना ही राज्यातील सर्व प्रकारच्या रेशनकार्डधारक नागरिकांना लागू करण्यात आली होती. तसेच त्याच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य शासनाकडून सरकारी रुग्णालयातील मोफत उपचारी घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांचा समावेश-
संविधानाने दिलेल्या अनुच्छेद 21अन्वये आरोगाच्या अधिकारा अंतर्गंत हा निरणय घेण्यात आला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गंत एकूण 2 हजार 418 संस्था असून या सर्व ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार हे निशुल्क असतील. यासाठी जो काही खर्च आहे तो खर्च राज्य सरकार उचलणार आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच जिल्हा ग्रामीण रुग्णालये, सरकारी महिला रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय यासह सुपर स्पेशालिटी रुग्णालये आणि कर्करोग रुग्णालयांमध्ये सरकार मार्फत मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.