गेल्या एकाही वर्षात भारतात अनेक स्मार्टफोन निर्मार्त्या कंपन्या सुरु झाल्या आहेत. भारतीयांना परवडेल अशा किमतीमध्ये स्मार्टफोन उपलब्ध करून दिले जात आहेत. यापैकी एक कंपनी म्हणजे लावा (Lava). Lava Mobiles ने नुकताच Lava Agni 2 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने आज दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर आपला सेल सुरू केला आहे. परंतु अनेक ग्राहकांच्या पदरी निराशा आली कारण काही मिनिटातच सगळेच्या सगळे स्मार्टफोन हातोहात विकले गेले आहेत.
Made in India ला ग्राहकांची पसंती
खरे तर हा मोबाईल फोन भारतीय बनावटीचा आहे इतकेच कारण यामागे नाही. स्वस्तात मस्त फीचर्स देणारा मोबाईल म्हणून देखील लावा ओळखला जातो. भारतीय युवा वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन हा मोबाईल डिझाईन केला गेला आहे. या फोनची बऱ्याच दिवसांपासून सोशल मिडीयावर चर्चा होती, मात्र आज अखेर हा मोबाईल फोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. यापुढील स्टॉक लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाईल असे कंपनीकडून सांगितले गेले आहे. तसेच आम्ही जो अंदाज घेऊन मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध केले होते, त्या हिशोबाने मागणी मात्र अधिक होती, त्यामुळे आम्ही सगळ्याच ग्राहकांना मोबाईल फोन उपलब्ध करून देऊ शकलो नाही असे म्हणत कंपनीने ग्राहकांची माफी देखील मागितली आहे.
The Next AGNI 2 sale date will be announced soon.
— Lava Mobiles (@LavaMobile) June 16, 2023
ज्या ग्राहकांना मोबाईल खरेदी करता आला नाही, अशांनी सोशल मिडीयावर कंपनीकडे तक्रारी देखील नोंदवलेल्या आहेत. Lava Agni 2 हा स्मार्टफोन आता लावा आणि ॲमेझॉन या दोन्ही वेबसाइटवर 'आउट ऑफ स्टॉक' दिसत आहे. चला जाणून घेऊया या फोनचे स्पेसिफिकेशन आणि खास फीचर्स.
किंमत आणि ऑफर
Lava Agni 2 5G स्मार्टफोन 8GB+256GB स्टोरेजमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. केवळ 21,999 रुपयांच्या किमतीत हा स्मार्टफोन कंपनीने विक्रीसाठी ठेवला आहे. तसेच ॲमेझॉनने यावर अतिरिक्त सवलत देखील देऊ केली आहे. काही निवडक बँकेच्या क्रेडीट आणि डेबिट कार्डाचा वापर करून पेमेंट केल्यास 1,999 रुपयांची सवलत देखील ग्राहकांना दिली जाणार आहे, म्हणजेच हा फोन ग्राहकांना सवलतीच्या दरात 20,000 रुपयांना देखील खरेदी करता येणार आहे.
हे आहेत फीचर्स
Lava Agni 2 स्मार्टफोन 6.78-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह कंपनीने डिझाईन केला आहे. यात HDR10+ सह 120Hz 3D डिस्प्ले देखील आहे. स्मार्टफोनची किंमत लक्षात घेता हे फीचर्स ग्राहकांना उत्तम अनुभव देणारे आहेत. चिपसेट बद्दल बोलायचे झाल्यास MediaTek Dimensity 7050 chipset ला सपोर्ट करणारा हा भारतातील पहिलाच स्मार्टफोन आहे.हा स्मार्टफोन Android 13 वर चालतो तसेच Android 14 आणि Android 15 वर हा स्मार्टफोन ग्राहकांना अपग्रेड देखील करता येणार आहे.
#LavaPromise. Agni 2 Software Update is Live Now!
— Lava Mobiles (@LavaMobile) June 15, 2023
- Improved Performance and Bug Fixes
- Display Brightness Optimization
- Charging Time Optimization
- New Dialer with Anonymous Auto Call Recording
- May'23 Security Update
Go to settings >System >Advanced >System Update pic.twitter.com/RCgyVIge9X
फोटोग्राफी आणि व्हिडियोग्राफीसाठी हा मोबाईल उत्तम ऑप्शन ठरू शकतो. हा स्मार्टफोन युजर्सला 50MP+8MP+2MP+2MP क्वाड कॅमेरा सेटअपसह सर्वोत्तम फोटोग्राफीचा अनुभव प्रदान करणार आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी 4700mAh बॅटरी यात दिली गेली आहे. याशिवाय 66W फास्ट चार्जिंगची सुविधा देखील यात दिली गेली आहे. साधारण वापर करणाऱ्या युजर्सला दिवसभर पुरेल अशी मोबाईल चार्जीग अनुभवता येणार आहे.
सध्या Lava Agni 2 स्मार्टफोन स्टॉकमध्ये नसला तरी लवकरात लवकर तो कंपनीकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.