Airtel Plan 150 Per Month: संपूर्ण देशभरात इंटरनेटचा वापर वाढला असतांना, इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमधील स्पर्धा देखील वाढत आहे. इंटरनेट, ब्रॉडबॅण्ड, कॉलिंगची सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आपले विविध प्लॅन मार्केटमध्ये आणत आहेत. याच अंतर्गत एअरटेल कंपनीने वर्षाला 1,799 रुपयांचा प्लॅन ग्राहकांकरीता आणला आहे. ज्याचा मासिक खर्च केवळ 150 रुपये येतो. या प्लॅनमधून ग्राहकांना वर्षभर कॉलिंग, इंटरनेट डेटा आणि एसएमएसचाही लाभ मिळणार आहे.
काय आहेत सुविधा
एअरटेलचा 1,799 रुपयांचा वार्षिक प्लॅन आहे. यामध्ये सिम 365 दिवस म्हणजे 12 महिने सुरु राहील. यामध्ये 12 महिने ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग मिळेल, दर महिन्याला 2GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच 24 जीबी डेटा संपूर्ण वर्षासाठी उपलब्ध असेल. हाय स्पीड डेटाची दैनंदिन मर्यादा संपल्यानंतर, मोबाईल डेटा स्पीड 64Kbps पर्यंत खाली येईल. एअरटेलच्या वार्षिक प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईल कॉलिंग मिळते. यासोबतच वर्षभर 3600 एसएमएस मोफत मिळणार आहेत. यासह एअरटेल प्लॅनमध्ये मोफत हॅलो ट्यून्स, विंक म्युझिक सबस्क्रिप्शन, यासारख्या आणखी काही गोष्टी ग्राहकाला मिळणार आहे.
ग्राहकांना परवडणारा प्लॅन
एअरटेलच्या 1,799 रुपयांच्या वार्षिक योजनेची मासिक किंमत पाहिली तर ती सुमारे 150 रुपये येते. याचा अर्थ 150 रुपयांमध्ये एअरटेलच्या ग्राहकांना अनलमिटेड व्हॉईस कॉल, मोफत एसएमएस यांसारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत. जरी ग्राहकांना एकदाच एवढे पैसे भरणे अवघड वाटत असले तरी, त्याचा चोख हिशेब लावल्यास महिन्याला फक्त 150 रुपये खर्च येतो. या दीडशे रुपयांमध्ये ग्राहकाला खूप चांगल्या सुविधा मिळत आहेत.
यासह एअरटेलमध्ये 24 दिवस चालणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये 155 रुपये आणि 239 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. तर 24 दिवस चालणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये 179, 265, 299, 399 आणि 499 रुपयांचे रिचार्ज प्लॅन आहेत. एअरटेल मध्ये 30 दिवस चालणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये 199, 296 आणि 489 रुपयांचे रिचार्ज प्लॅन ही आहेत. 1 महिना चालणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये 319, 359 आणि 509 रुपयांचे रिचार्ज प्लॅन आहेत.