Airtel Tied Up With Care Health Insurance: एअरटेल ग्राहकांना आता कस्टमाइज्ड हेल्थ केअर इन्शुरन्सची सुविधा मिळणार आहे. एअरटेल थँक्स अॅपच्या बँकिंग विभागाद्वारे ग्राहकांना कस्टमाइज्ड आणि सर्वसमावेशक आरोग्य विमा तसेच एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध होणार आहे.
Table of contents [Show]
काय असेल सुविधा
एअरटेल पेमेंट्स बँकेचे ग्राहक त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी विमा रकमेच्या पर्यायासह सर्वसमावेशक व्यापक कव्हरेजचा लाभ घेऊ शकतील. यामध्ये 50,000 रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत विमा कव्हरेज उपलब्ध असणार आहे. यासोबतच इतरही अनेक फायदे मिळतील, ज्यामध्ये आधीपासून असलेल्या आजारांसोबतच डे-केअर उपचारही उपलब्ध होतील.
विमा कसा खरेदी कराल
केअर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीधारकाला कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देण्याची खात्री देते. या आरोग्य विमा योजनेत ग्राहक सहजपणे नावनोंदणी करू शकतात. नावनोंदणी करण्याची पध्दत सुरक्षित आणि सोपी आहे. हा विमा खरेदी करण्यासाठी तुम्ही एअरटेल थँक्स अॅपचे एअरटेल पेमेंट बँक खाते वापरु शकता आणि नेटबँकिंग किंवा इतर कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्डद्वारे पैसे देऊन हा आरोग्य विमा खरेदी करु शकता. तसेच, या प्लॅन मध्ये स्वतःची नोंदणी करण्यासाठी ग्राहक एअरटेल पेमेंट्स बँकेच्या जवळच्या बँकिंग पॉईंटला देखील भेट देऊ शकता.
सर्वसमावेशक आरोग्य विमा म्हणजे काय?
सर्वसमावेशक (Comprehensive) आरोग्य सेवेमध्ये गुंतवणुकीचा अर्थ असा होतो की, तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त आरोग्य योजनेत गुंतवणूक करण्याची गरज नाही. कारण सर्वसमावेशक आरोग्य सेवा योजनेमध्ये अवयव दाता कव्हर, आधुनिक उपचार आणि बरेच काही यासारख्या प्रगत उपचारांचा समावेश होतो. सर्वसमावेशक आरोग्य सेवा त्यांच्या सर्वसमावेशक कव्हरेजसाठी ओळखली जाते आणि त्यामध्ये खोलीचे भाडे कव्हर, रोड अॅम्ब्युलन्स कव्हर, हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि पोस्ट कव्हर, डे केअर ट्रीटमेंट, होम हॉस्पिटलायझेशन, आयुष उपचार आणि बरेच काही समाविष्ट असते.
कंपन्यांची भूमिका
'आमच्या ग्राहकांना आरोग्य विम्याची व्यापक श्रेणी उपलब्ध करून देण्यासाठी केअर हेल्थ इन्शुरन्सशी करार करताना आम्हाला आनंद होत आहे. विमा नसलेल्या किंवा आधीच घेतलेला असलेल्या लाखो ग्राहकांना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या वितरण नेटवर्कचा लाभ घेत आहोत. वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या या काळात, आरोग्य विमा कवच तुम्हाला तुमच्या प्रियजनांची काळजी घेण्याची आणखी सोई उपलब्ध करुन देते, अशी माहिती एअरटेल पेमेंट्स बँकेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर गणेश अनंतनारायण यांनी दिली.
एअरटेल पेमेंट्स बँकेच्या प्रचंड मोठ्या ग्राहकांना सर्वसमावेशक अशा विमा पॉलिसीची ओळख करुन देतांना आम्हाला आनंद होत आहे, असे वक्तव्य केअर हेल्थ इन्शुरन्सचे वितरण प्रमुख अजय शाह यांनी केले.