Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air India Ticket Sale: अवघ्या 1470 रुपयांत करा विमान प्रवास, एअर इंडियाची 96 तासांची विशेष सवलत योजना

air india

Air India Ticket Sale:डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल रुटवर एअर इंडियाकडून निवडक तिकिटे सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. या स्पेशल सेलमधील बुक झालेल्या तिकिटांवर 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या दरम्यान विमान प्रवास करता येईल.

टाटा ग्रुपची मालकी असलेल्या एअर इंडियाने 96 तासांचा सवलतीतील तिकिटांचा स्पेशल सेल जाहीर केला आहे. या सेलमध्ये देशांतर्गत आणि इंटरनॅशनल प्रवासासाठी सवलतीत विमान तिकिटे उपलब्ध केली जाणार आहेत. देशांतर्गत विमान प्रवास अवघ्या 1470 रुपयांत तर आंतरराष्ट्रीय प्रवासाचे तिकिट 10 हजार 130 रुपयांत उपलब्ध करण्यात आले आहे.

एअर इंडियाचा 96 तासांचा विशेष तिकिट सेल आज 17 ऑगस्ट 2023 पासून सुरु झाला आहे. प्रवाशांना येत्या 20 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत या सेलमध्ये सवलतीच्या दरात तिकिटे बुक करता येतील. इकॉनॉमी आणि बिझनेस क्लासमधील तिकिटांवर 30% पर्यंत सवलत मिळणार आहे.

डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल रुटवर एअर इंडियाकडून निवडक तिकिटे सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. या स्पेशल सेलमधील बुक झालेल्या तिकिटांवर 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या दरम्यान विमान प्रवास करता येईल.

या सेलमध्ये तिकिट बुकिंगवर प्रवाशांना शून्य कनव्हेयन्स फी, तिकिटांवर 15% सवलत आणि दुपटीने लॉयल्टी बोनस दिला जाणार आहे. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार या 96 तासांच्या विशेष सेलमध्ये स्थानिक पातळीवर देशांतर्गत प्रवासासाठी प्रवाशांना सर्वसमाविष्ट खर्चांसह तिकिट दर 1470 रुपये इतका आकारण्यात येईल.

इंटरनॅशनल प्रवासाचा तिकिट दर सर्वसमाविष्ट खर्चांसह 10 हजार 130 रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी काही निवडक मार्गांवर सवलतीत तिकिटे उपलब्ध करुन दिली असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. या सवलत योजनेत सवलतीच्या दरात मर्यादित तिकिटे आहेत. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वाने तिकिटांचे बुकिंग स्वीकारले जाणार असल्याचे एअर इंडियाने निवेदनात म्हटले आहे.

टाटा समूहाने सध्या एअर इंडियामध्ये संरचनात्मक सुधारणांना प्राधान्य दिले आहे. एअर इंडियाने 30 बिलियन डॉलर्सचे नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. 470 नवीन विमाने एअर इंडियाकडून ऑर्डर देण्यात आली आहे.  एअर इंडियाने सुधारणांबरोबरच सेवा विस्तारावर भर दिला आहे. प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी व्यवस्थापनाला दिले आहेत.

सवलतीच्या दरात तिकिटांचे बुकिंग करायचे इथे क्लिक करा

एअर इंडियाचा 96 तासांच्या सेलमध्ये प्रवाशांना एअर इंडियाच्या वेबसाईटवरुन तिकिट बुक करता येईल. त्याशिवाय एअर इंडिया मोबाईल अ‍ॅपवरुन देखील तिकिट बुक करु शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. या विशेष सेलमध्ये कंपनीकडून तिकिट बुकिंग शुल्क माफ करण्यात आले आहे. याशिवाय एअर इंडियाच्या अधिकृत ट्रॅव्हल्स एजंटच्या माध्यमातून देखील सेलमधील तिकिटांचे बुकिंग करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.