Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Today: पहिल्या दिवसाच्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांचे आज शेअर बाजाराकडे लक्ष

Share Market Today

Share Market Today : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह लाल चिन्हावर बंद झाला. आता मंगळवारी Share Market ची स्थिती काय असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

सोमवारी सेन्सेक्स 311 अंकांनी घसरून 60,691.54 वर बंद झाला तर निफ्टी 99.60 अंकांनी घसरून 17,844.60 वर बंद झाला. देशांतर्गत शेअर बाजारात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांमध्ये कमालीची कमजोरी दिसून आली. अदानी एंटरप्रायझेस हा निफ्टीमधील सर्वात असुरक्षित शेअर्सपैकी एक होता. त्यात 5.88 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. तर, Divs Lab हा निफ्टी 2.5% वाढून अव्वल ठरला.

BSE सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या 30 समभागांपैकी 18 समभाग घसरले, तर 12 समभाग वाढीसह  बंद झाले. मारुतीचे शेअर्स 1.3 टक्क्यांनी खाली आले. दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स 1.6% वाढून बंद झाले. बीएसईच्या आकडेवारीनुसार सोमवारी 3738 शेअर्सचे व्यवहार झाले. यामध्ये 2175 समभाग घसरणीसह बंद झाले, तर 241 समभाग लोअर सर्किटला आले. बाजारातील कमजोरीमुळे  सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 265.90 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

विदेशी गुंतवणूकदारांचे गुंतवणूक मूल्य 11 टक्क्यांनी घटले 

गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचे गुंतवणूक मूल्य 11 टक्क्यांनी कमी होऊन 584 अब्ज डॉलर  झाले आहे. भारतीय बाजारात कमी नफा आणि परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याने हे घडल्याचे विश्लेषण करण्यात येत आहे.  मॉर्निंगस्टारच्या मते, 2022 मध्ये भारतीय बाजारपेठेत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचे (FPIs) एकूण गुंतवणूक मूल्य 654 अब्ज डॉलर असण्याची अपेक्षा होती. त्रैमासिक आधारावर सप्टेंबर 2022 अखेर ती तीन टक्क्यांनी वाढून 566 अब्ज डॉलरवर  पोहोचली होती. ही सलग दुसरी तिमाही होती जेव्हा गुंतवणुकीचे मूल्य वाढले होते. 2020 आणि 2021 मध्ये मजबूत वाढीनंतर, 2022 मध्ये जागतिक बाजार घसरले. यादरम्यान 1.21 लाख कोटी रुपये काढण्यात आले. एकूणच अर्थव्यवस्थेतील  घडामोडींचा शेअर बाजारावर प्रभाव पडताना दिसतो. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 5-5.1 टक्क्यांच्या वेगाने वाढू शकते. दुसर्‍या तिमाहीतील 6.3 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत हा दर खूपच कमी आहे. ICRA रेटिंग्सच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर म्हणाल्या, "प्री-कोरोना आकडेवारीशी तुलना करता, भारताचा GDP तिसऱ्या तिमाहीत 11.6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे." बार्कलेज इंडियाचे प्रमुख राहुल बाजोरिया म्हणाले, तिसऱ्या तिमाहीत विकास दर 5 टक्के असेल.

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह लाल चिन्हावर बंद झाला. आता या पार्श्वभूमीवर  मंगळवारी Share Market ची स्थिती काय असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.