अदानी समूहातील अदानी विल्मर कंपनीचा शेअर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.आज मंगळवारी 27 डिसेंबर रोजी अदानी विल्मरचा शेअर 5% ने वधारला आहे. सलग दोन सत्रात अदानी विल्मरच्या शेअरमध्ये 10% वाढ झाली. वर्ष 2022 मधील मल्टिबॅगर स्टॉक ठरलेला अदानी विल्मरने फेब्रुवारी 2022 पासून 140% वाढ नोंदवली आहे.
अदानी विल्मरचा शेअर आज मंगळवारी 550.85 रुपयांवर गेला. गेल्या आठवड्यात सलग आठ सत्रात अदानी विल्मरचा शेअर 23% ने घसरला होता. मात्र सोमवारपासून या शेअरने पुन्हा तेजीची वाट धरली आहे. यामुळे ब्रोकर्स कंपन्यांनी अदानी विल्मरबाबत सुधारित अंदाज व्यक्त केले आहेत. Trendlyne या ब्रोकरनुसार अदानी विल्मरचा शेअरचा 751 रुपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. शेअरमध्ये सध्याच्या स्तरावर 12% वाढ होण्याची क्षमता आहे. हा शेअर 614 रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पाचपैकी तीन शेअर बाजार विश्लेषकांनी शेअरची सध्याच्या स्तरावर विक्री करण्याचा सल्ला दिला आहे.एकाने खरेदीचा आणि एका विश्लेषकाने अदानी विल्मरचा शेअर होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
आज इंट्रा डेमध्ये अदानी विल्मराचा शेअर 550.85 रुपयांचा उच्चांक गाठला होता.अदानी विल्मरने 52 आठवड्यात 878.35 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. हा शेअर 52 आठवड्यात 221.00 रुपयांच्या नीचांकी स्तर गाठला होता.
अदानी विल्मरची आर्थिक कामगिरी
आर्थिक वर्ष 2023 मध्ये अदानी विल्मरला 48.76 कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नफ्यात 73.25% घसरण झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 182.33 कोटींचा नफा झाला होता. नफ्यात घसरण झाली असली तरी महसुलात मात्र वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत अदानी विल्मरला 14150 कोटींचा नफा झाला. त्यात 4.36% वाढ झाली. कंपनीच्या एकूण खर्चात 6% वाढ झाली. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 14149 कोटींचा खर्च झाला.