अदानी समूहाशी (Adani Group) संबंधित बातम्या येत राहतात आणि त्याचा परिणाम समूहाच्या कंपन्यांच्या लिस्टेड शेअर्सवर दररोज दिसून येत आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अनेक दिवसांपासून प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आजही त्यांच्या शेअर्समध्ये मोठी हालचाल पाहायला मिळते कारण अदानी ग्रुपबद्दल एक नवीन अपडेट आले आहे. दरम्यान बीएसईच्या आकडेवारीनुसार, अदानी समूहाच्या 7 प्रमुख कंपन्यांपैकी 5 कंपन्यांमध्ये 5 टक्के लोअर सर्किट आहे. उर्वरित दोन कंपन्यांच्या समभागात घसरण आहे.
Table of contents [Show]
अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स तारण ठेवले
अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (SBI – State Bank of India) अतिरिक्त शेअर्स गहाण ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वी, अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने अदानीवर फसवणुकीचा आरोप केल्यानंतर, त्याच्या बाजार मूल्यात सुमारे 120 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. तेव्हापासून गुंतवणूकदारांमध्ये समूहाच्या कंपन्यांबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला पाठवली सूचना
कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या सूचनेत म्हटले आहे की समूह कंपन्यांनी - अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ), अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी यांनी त्यांचे शेअर्स एसबीआयचे एक युनिट एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनीकडे गहाण ठेवले आहेत.
किती शेअर्स तारण ठेवले आहेत?
माहितीनुसार, एपीएसईझेड (APSEZ) चे आणखी 75 लाख शेअर्स तारण ठेवण्यात आले आहेत, त्यानंतर त्याच्या सर्व शेअर्सपैकी एक टक्का एसबीआय कॅपकडे तारण ठेवण्यात आले आहे. तर, अदानी ग्रीनचे अतिरिक्त 60 लाख शेअर्स गहाण ठेवल्यानंतर, एसबीआय कॅपने कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी 1.06 टक्के शेअर्स तारण ठेवले आहेत, तर अदानी ट्रान्समिशनचे आणखी 13 लाख शेअर्स तारण ठेवल्यानंतर त्याच्या एकूण शेअर्सपैकी 0.55 टक्के शेअर्स तारण ठेवले आहेत.
अदानी समूहाच्या शेअर्सची घसरण सुरूच
- अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून किंमत 1748.95 रुपये झाली आहे.
- अदानी पोर्ट आणि सेझचे शेअर्स 5.52 टक्क्यांनी घसरून 551.60 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
- अदानी पॉवरच्या शेअर्सने 5 टक्क्यांनी लोअर सर्किट मारले आहे, त्यानंतर किंमत 156.10 रुपयांवर व्यवहार करत आहे.
- अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सने 5 टक्क्यांनी लोअर सर्किट मारला आहे, त्यानंतर किंमत 1126.85 रुपयांवर व्यवहार करत आहे.
- अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटला पोहोचला आहे, त्यानंतर त्याची किंमत 687.75 रुपये आहे.
- अदानी टोटल गॅसचा शेअर 5 टक्क्यांनी लोअर सर्किटला आला आहे, त्यानंतर किंमत 1195.35 रुपयांवर व्यवहार करत आहे.
- अदानी विल्मरच्या शेअरने 5 टक्क्यांनी लोअर सर्किट मारले आहे, त्यानंतर किंमत 414.30 रुपयांवर व्यवहार करत आहे.