Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top Gainer-Losers Stocks: शेअर मार्केटमध्ये आज पुन्हा अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये घसरण; तर 'हे' शेअर्स तेजीत

Top Gainer-Losers Stocks

Top Gainer-Losers Today: बुधवारी शेअर मार्केटमध्ये चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स सुमारे 900 अंकानी खाली आला होता. पण आज गुरूवारी (दि. 23 फेब्रुवारी) मात्र मार्केट संथगतीने सुरू आहे.

Top Gainer-Losers Shares Today: बुधवारच्या घसरणीनंतर गुरूवारी सकाळी भारतीय शेअर मार्केट किंचित वाढीसह ओपन झाला होता. सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक पुढील 15 मिनिटे पुन्हा खाली येत होता. पण 9.45 च्या एका स्ट्रॉंग कॅडेंलनंतर सेन्सेक्स किचिंत वर जाऊन कन्सॉलिडिटेड मोडमध्ये गेला. यादरम्यान सेन्सेक्स फक्त 100 ते 130 या रेंजमध्येच वर-खाली होत आहे. दुपारी 2 वाजता सेन्सेक्स 59,800 तर निफ्टी 17,566 वर ट्रेडिंग करत होता.

दुपारच्या सत्रात शेअर मार्केटमधील ग्रुप अ मधील संदुर एम अॅण्ड आय या कंपनीचा शेअर सर्वाधिक 11.84 टक्क्यांनी वधारला आहे. त्यानंतर इक्विटास स्मॉल फायनान्स 8.31 टक्के, उषा मार्टिन लिमिटेड 7.60 टक्के, एव्हरेस्ट कांतो सिलाईड 7.53 टक्के, इन्फिबेम अव्हेन्यू 7.17 टक्के, फिनोलेक्स केबल्स 6.93 टक्के, शिपिंग कॉर्पोरेशन 6.92 टक्के, रेट गेन ट्रॅव्हल टेक 6.19 टक्के आणि टाटा टेलीसर्व्हिसेसचा 5.76 टक्क्यांनी वाढला होता.

share market gainer 23 feb 2023
गुरूवारी (दि. 23 फेब्रुवारी) ग्रुप ए मधील वधारलेल्या कंपन्या. Source: Rediffmoney.com

तर पडलेल्या शेअर्समध्ये आरआरबी इन्फ्रास्ट्रक्चर हा सर्वांत वर आहे. तो दुपारपर्यंत सुमारे 13.16 टक्क्यांनी घसरला होता.त्यानंतर अदानी ग्रीन एनर्जी 5 टक्के, इकी एनर्जी सर्व्हिसेस 5 टक्के, अदानी ट्रान्समिशन 5 टक्के, अदानी टोटल गॅस 4.99 टक्के, तेजस नेटवर्क 4.65 टक्के, अदानी पॉवर लिमिटेड 4.46 टक्के, कॉफी डे एंटरप्रायसेस 3.99 आणि झी एंटरटेंनमेंट 3.98 टक्क्यांनी घसरला होता.

share market losers 23 feb 2023
गुरूवारी (दि. 23 फेब्रुवारी) ग्रुप ए मधील घसरण झालेल्या कंपन्या. Source: Rediffmoney.com

आज पुन्हा एकदा अदानी समुहातील वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. एकूण मार्केटमधील सेक्टरचा विचार केला तर, मेटल, ऑईल गॅस, एनर्जी, बीएसई-आयटी ऑटो, टेलिकॉम या सेक्टरमधील कंपन्या तेजीत होत्या. तर इन्फ्रा, पॉवर, रिअल्टी, फिन या सेक्टरमधील कंपन्यांमध्ये घसरण झाली.  

मार्केटवर परिणाम करणाऱ्या घडामोडी

अमेरिकेच्या उत्पादन किंमत निर्देशांकाने जानेवारीमध्ये वाढ झाल्याचे दर्शवल्याने, फेडरल रिझर्व्हकडून येत्या काही दिवसांत आणखी व्याजदर वाढवण्याची शक्यता दिसून आल्याने, त्याचा चांगलाच परिणाम बुधवारी (दि.22 फेब्रुवारी) भारतीय शेअर मार्केटवर झाला. त्याचबरोबर अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्समध्ये पुन्हा एकदा घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून अदानी कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार विक्री होत आहे. हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने केलेल्या आरोपानंतर अद्याप अदानी ग्रुपची पडझड सुरूच आहे.गुरूवारीही (दि. 23 फेब्रुवारी) अदानी ग्रुपमधील सर्व शेअर्स लाल रंगात आहेत. तर फक्त अदानी पोर्ट आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात दिसत आहेत. आतापर्यंत सुमारे अदानी ग्रुपमधील कंपन्यांनी 11.76 लाख कोटी रुपंयांचे भांडवल गमावले आहे.