Acer ही सध्या परवडणाऱ्या दरात लॅपटॉप उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. सामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आणि तुलेनेन स्वस्त लॅपटॉप ही कंपनी बाजारात आणत असते. या कंपनीचे वेगवेगळे मोडेल्स सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Acer ने भारतात नुकताच आपला नवीन लॅपटॉप Acer Nitro 16 लॉन्च केला आहे. Acer Nitro 16 ला AMD Ryzen 7 7840HS ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि GeForce RTX 4060 आणि GeForce RTX 4050 ग्राफिक्सचे दोन पर्याय उपलब्ध करून दिलेआहेत. सध्या इंटरनेटवर या लॅपटॉपची चांगलीच चर्चा सुरु आहे. चला तर जाणून घेऊया या लॅपटॉपचे फीचर्स आणि किंमत…
Acer Nitro 16 किंमत किती?
Acer Nitro 16 च्या AMD Ryzen 7 7840HS प्रोसेसर आणि Nvidia GeForce RTX 4050 6GB ग्राफिक्स व्हेरिएंटची किंमत 1,14,990 रुपये इतकी आहे. तर GeForce RTX 4050 8GB ग्राफिक्स असलेल्या मॉडेलची किंमत 1,43,550 रुपये इतकी आहे. हाय एंड स्पेसिफिकेशन असलेला हा लॅपटॉप इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त दरात आहे. सध्या ऑब्सिडियन ब्लॅक कलरमध्ये हा लॅपटॉप खरेदी करता येणार आहे.
Acer Nitro 16 Laptop ची स्पेसिफिकेशन
Acer Nitro 16 16-इंच एलईडी बॅकलिट TFT LCD स्क्रीनमध्ये उपलब्ध आहे. जो नेण्या-आणण्यासाठी आणि वापरण्यासाठी चांगला अनुभव देणारा ठरणार आहे. तसेच या लॅपटॉपसोबत जी 4-झोन RGB बॅकलाइट कीबोर्डसह दिला जात आहे. कमी प्रकाशात देखील युजर्सला कीबोर्ड वापरता येणार आहे.
Acer Nitro 16 मध्ये 165Hz च्या रिफ्रेश रेटसह 16-इंचाची WUXGA स्क्रीन आहे. त्याची कमाल ब्राइटनेस 400 निट्स आहे. हे AMD Ryzen 7 7840HS प्रोसेसरसह 32GB पर्यंत DDR5 RAM आणि 512GB PCIe Gen4 NVMe स्टोरेज दिला जातोय. लॅपटॉपमध्ये प्री-इंस्टॉल केलेले Windows 11 उपलब्ध आहे.
Acer Nitro 16 मध्ये ड्युअल फॅन कूलिंग सिस्टम आहे. यामुळे लॅपटॉप लवकर गरम होणार नाही आणि हार्डवेयरचे संभाव्य नुकसान टळू शकते. लॅपटॉपमध्ये ड्युअल 2W स्पीकर्स आहेत, त्यामुळे व्हिडियो बघताना, गाणी ऐकताना युजर्सला चांगला अनुभव घेता येणार आहे.सोबतच 330W अडॅप्टरसह 90Wh बॅटरी पॅक दिला जात आहे, बॅटरीबाबत 10 तासांच्या बॅकअपचा दावा कंपनीने केला आहे.