युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या (United Spirits limited) स्टॉकनं जवळपास 7 टक्क्यांचा परतावा दिला आहे. शुक्रवारी 65 रुपयांच्या वाढीसह 1040 रुपयांच्या पातळीवर तो व्यवहार करत होता. मागच्या 5 दिवसात युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना (Investors) 9 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. त्याचे शेअर्स (Shares) 957 रुपयांच्या पातळीवरून 1040 रुपयांच्या पातळीवर पोहोचल्याचं दिसून आलं आहे.
Table of contents [Show]
महिनाभराचा परतावा 26 टक्के
मागच्या महिनाभरात युनायटेड स्पिरिट्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 894 रुपयांच्या स्तरावरून 1040 रुपयांच्या पातळीवर 16 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. जर मागच्या 6 महिन्यांचा विचार केल्यास युनायटेड स्पिरिट्सच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना 829 ते 1040 रुपयांपर्यंत जवळपास 26 टक्के इतका परतावा दिला आहे.
वर्भराचा परतावा 24 टक्के
या वर्षी 2 मार्चला, युनायटेड स्पिरिट्सचे शेअर्स 735 रुपयांच्या पातळीवर होते. गुंतवणूकदारांना आतापर्यंत 40 टक्क्यांचा बंपर परतावा मिळाला आहे. या वर्षी 28 मार्च रोजी, युनायटेड स्पिरिट्सचे शेअर्स 740 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. त्यावेळी गुंतवणूकदारांना 300 रुपयांचा परतावा मिळाला आहे. मागच्या 1 वर्षाचा विचार केल्यास युनायटेड स्पिरिट्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा दिला आहे. तर मागच्या 5 वर्षात 75 टक्क्यांचा बंपर असा परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.
#UnitedSpirits' PAT rises 82.6% year-on-year to Rs 476.7 crore in the first quarter. #Q1WithBQ
— BQ Prime (@bqprime) July 20, 2023
For all the latest earnings updates visit: https://t.co/RuAbYa3gGa pic.twitter.com/GhPrvgHuWp
नीचांकी पातळीवर जाऊनही परतावा चांगला
3 एप्रिल 2020रोजी, युनायटेड स्पिरिट्सचे शेअर्स 465 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होते. त्यावेळी गुंतवणूकदारांना 140 टक्क्यांचा परतावा मिळाला. युनायटेड स्पिरिट्स देशातली सर्वात मोठी व्हिस्की, बिअर निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्सची 9 नोव्हेंबर 2001 रोजी 9.78 रुपयांवरून व्यापार करण्यास सुरुवात झाली, जिथून गुंतवणूकदारांना बंपर असा परतावा मिळाला आहे.
जून तिमाही निकालानंतर तेजी
जून तिमाहीच्या निकालानंतर युनायटेड स्पिरिट्सच्या शेअर्समध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, युनायटेड स्पिरिट्सची विक्री 2668 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत ती 29 टक्के वाढली आहे.
चालू आर्थिक वर्षाचा नफा
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत युनायटेड स्पिरिट्सचा कार्यरत नफा 714 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यात 130 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत युनायटेड स्पिरिट्सचा कर भरल्यानंतरचा नफा 477 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
बाजारात नरमाई, तरीही...
युनायटेड स्पिरिट्सच्या चांगल्या निकालामुळे त्याच्या शेअरमध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी शेअर बाजारात नरमाईचं वातावरण होतं, त्यानंतरही शेअर्सच्या वाढीवरून कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना बंपर परतावा देण्याची क्षमता असल्याचं दिसून आलं.