• 07 Dec, 2022 09:10

TATA Motors Q2 Results 2022 : दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सला 944 कोटी रुपयांचा तोटा!

TATA Motors Q2 Results 2022 : दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सला 944  कोटी रुपयांचा तोटा!

TATA Motors Q2 Results 2022 : टाटा मोटर्स कंपनीने बुधवारी कंपनीचा दुसरा तिमाही अहवाल प्रसिद्ध केला. या तिमाही अहवालात टाटा मोटर्स कंपनीला सुमारे 944 कोटी रुपयांचा तोटा झाला. दरम्यान टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्याभरात किमान 9.38 टक्के वाढ झाली.

देशातील नामांकित कंपन्यांपैकी एक म्हणजे टाटा मोटर्स (TATA Motors). टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांमधील एक आहे. बुधवारी (दि. 9 नोव्हेंबर) टाटा मोटर्सच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. मागील वर्षी याच तिमाहीत टाटा मोटर्सला 4441.6 कोटी इतका तोटा झाला होता आणि या वर्षी 944.6 कोटींवर आला आहे. यावरून मागील वर्षीच्या सप्टेंबर तिमाही पेक्षा या वर्षी तोटा कमी झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. जून मध्ये जाहीर करण्यात आलेल्या तिमाहीत 5006.60 कोटी रुपयांचा तोटा कंपनीला झाला होता. 

कंपनीचे उत्पन्न वाढले!

टाटा मोटर्स कंपनीला 2021-22 या आर्थिक वर्षात जुलै-सप्टेंबर तिमाहीत 4,416 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सचे एकूण उत्पन्न वाढून 80,650 कोटी रुपये झाले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ते 62,246 कोटी रुपये होते.

तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 293 कोटी रुपयांवर आला. मागील वर्षी याच तिमाहीत 659 कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्नही 15,142 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 11,197 कोटी रुपये होते. मागील वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 61378.82 कोटी रुपये होता, आता कंपनीचा एकत्रित महसूल 29.7 टक्के वाढून 79611.3 कोटी रुपये झाला आहे. 

विश्लेषकांचा अंदाज चुकला!

टाटा मोटर्सचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल अंदाजापेक्षा चांगले सांगितले जात होते. बहुतेक विश्लेषकांना कंपनीच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा होती, परंतु कंपनीच्या तोट्याबद्दल ते सहमत नव्हते. अनेकांनी तिमाही तोटा कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला होता, तर अनेकांनी त्यात वाढ होण्याची भीतीही व्यक्त केली होती.

TATA MOTORS LTD. SHARES PRICE

टाटा मोटर्सच्या शेअर्सची स्थिती 

टाटा मोटर्सचा शेअर गुरूवारी NSE वर 20.95 टक्क्यांनी घसरून 412.20 रुपयांवर बंद झाला. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 9.38 टक्के वाढ झाली. गेल्या 6 महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स सुमारे 10.56 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र गेल्या वर्षभरात या शेअर्समध्ये 15.20 टक्क्यांची घसरण झाली आहे.