Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC OFS: केंद्र सरकार IRCTC मधील हिस्सा विकण्याच्या घोषणेमुळे शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण!

IRCTC Share Price Fall

IRCTC OFS: रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझिम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) शेअर्समध्ये गुरूवारी (दि.15 डिसेंबर) मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली.

IRCTC Share Price: रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझिम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) शेअर्समध्ये गुरूवारी (दि.15 डिसेंबर) सकाळच्या सत्रात 5 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले. आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे कारण म्हणजे सरकारने या कंपनीतील 5 टक्के हिस्सा विकण्याची घोषणा केली. सरकारने 15 आणि 16 डिसेंबरला बीएसई आणि एनएसईवर ऑफर फॉर सेल (Offer for Sale-OFS) द्वारे कंपनीतील 5 टक्के हिस्सा विकणार आहे. यासाठी सरकारने प्रति शेअर्सची किंमत 680 रुपये निश्चित केली. यामुळे आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये एवढी घसरण झाली.

IRCTC चा शेअर कोसळून गुरूवारी सकाळी 698 रुपयांवर ओपन झाला. त्यापूर्वी बुधवारी (दि. 14 डिसेंबर) आयआरसीटीसीचा शेअर 733.50 रुपयांवर बंद झाला होता. सरकारने या कंपनीतील 5 टक्के हिस्सा विकण्याची घोषणा केल्याने या शेअर्सच्या किमतीवर लगेच परिणाम झाला आणि यात घसरण सुरू झाली.

IRCTC मध्ये सरकारचा 67.4 टक्के हिस्सा!

रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझिम कॉर्पोरेशन (IRCTC)मध्ये सरकारचा 67.4 टक्के हिस्सा आहे. केंद्र सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षांतर्गत गुंतवणुकीच्या माध्यमातून 65 हजार कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यानुसार सरकार 5 टक्के हिस्सा विकून ही रक्कम उभी करणार आहे. IRCTC ने यासाठी ऑफर फॉर सेलसाठी 4 कोटी इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या ऑफर फॉर सेलसाठी ॲक्सिस कॅपिटल, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स, गोल्डमॅन सॅक्स आणि जेएम फायनान्शिअल ब्रोकर म्हणून काम करणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना ऑफर फॉर सेल अंतर्गत 16 डिसेंबरपासून IRCTCचे शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

IRCTCच्या शेअर्सची वर्षभरातील कामगिरी!

IRCTCचा शेअर या वर्षभरात किमान 17 टक्क्यांनी खाली आला आहे. वर्षभरात यामध्ये 17.60 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून येते. पण त्याचवेळी या शेअर्सने गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्नसुद्धा दिले आहेत. 5 वर्षांत हा शेअर 350.11 टक्क्यांनी वाढला आहे. सप्टेंबर, 2022 च्या तिमाहीत IRCTC ला एकूण 226 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर जूनच्या तिमाहीत कंपनीचा नफा 245.5 कोटी रुपये होता.